Pune Corporation | रस्ते, पदपथ, पोल, ड्रेनेजसारख्या कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुणे महापालिका ‘या’ सॉफ्टवेअरचा वापर करणार

0
66
Pune Corporation | To avoid repetition of works like roads, sidewalks, poles, drainage Pune Municipal Corporation to use GIS based 'Integrated Work Management System' - Vikram Kumar, PMC Commissioner
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | वित्तीय समितीच्या माध्यमातून अनावश्यक खर्चांवर निर्बंध आणणारे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी पुढील काळात शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, भवन, ड्रेनेजसह सर्व इंजिनिअरींग कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘इंटीग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम’ (GIS-Integrated Work Management System) या सॉफ्टवेअर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जीआयएस’ (GIS) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनावश्यक कामांना किंबहुना कामांची पुनरावृत्ती टाळली जाणार असून कामाचा दर्जाही उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच बिलिंगसाठीच्या ‘सॅप’ सिस्टिम सोबतही हे सॉफ्टवेअर जोडले जाणार असल्याने ठेकेदारांनाही ऑनलाईन बिले सादर करून वेळेत कामांचे पैसे मिळतील, असा दावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केला आहे. (Pune Corporation)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

विक्रम कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की अनेकदा एकाच कामांची वारंवार पुनरावृत्ती होत असते. उदा. एखाद्या रस्त्याचे काम वर्षभरापुर्वी केले असले तरी वर्षभराने त्याच रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविल्या जातात. हे करत असताना संबधित रस्त्याच्या नावात बदल केले जात असल्याने चटकन लक्षात येत नाही. रस्ते, पदपथ, ड्रेनेज लाईन, विद्युत पोल अशा कामांमध्ये क्षेत्रिय कार्यालय स्तरावर अथवा मुख्य खात्याकडूनही कामांची पुनरूवृत्ती होण्याची शक्यता अधिक असते. बदलणारी वॉर्ड रचना, अधिकार्‍यांच्या बदल्या आणि मागील रेकॉर्ड शोधण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे या चुका होत असतात. (Pune Corporation)

महापालिकेकडून दरवर्षी हजारो कामांच्या निविदा (Tender) काढल्या जात असल्याने या त्रुटी राहातात. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare) यांच्या नेतृत्वाखाली सीएसआरच्या (CSR) माध्यमातून जीआयएस बेडस् ‘इंटीग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम’ या सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये विभागवार मागील कामांच्या नोंदी अपलोड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेले बजेट कोडनुसार संबधित कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधीही सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात येत आहे. जे काम करायचे आहे, त्याचा जीआयएस मॅप हा टॅग करण्याची सुविधा सॉफ्टवेअरमध्ये असेल. तसेच प्रत्येक कामासाठीचे निश्‍चित करण्यात आलेले डीएसआर रेटस्ही या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आले असल्याने संबधित कामाचे ऑनलाईनच एस्टीमेट करणे अधिक सोपे होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे लॉकींग करून त्या कामाचे पैसे अन्य कामासाठी वळविता येणार नाहीत. (Pune Corporation)

 

यासोबतच बिलिंगसाठी प्रशासनाने ‘सॅप’ सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. इंटीग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम ही सॅप सोबत जोडण्यात येणार आहे. बिलिंगसाठी ठेकेदाराना त्यांचा लॉगीन आयडी देण्यात येईल. यामुळे बिलांची फाईल सबमिट करणे यासाठी विविध टेबलवर जावे लागणार नाही व लवकरात लवकर बिल अदा करण्याची प्रक्रिया सोपी होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

जीआयस बेसड् हे सॉफ्टवेअर सीएसआर च्या माध्यमातून तयार करून घेण्यात आले आहे.
पुढील पाच वर्षे त्याचे संचलन सॉफ्टवेअर विकसकाकडूनच केले जाणार आहे.
हे सॉफ्टवेअर वापराबाबत सर्वच विभागातील अभियंत्यांना ४ ते ८ एप्रिल दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आगामी अर्थात २०२२-२३ या वर्षीच्या अंदाजपत्रकातील कामांपासून या सॉफ्टवेअरचा वापर सुरू होईल.
सॉफ्टवेअरचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात येतील.

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.

 

महापालिकेच्यावतीने करण्यात येणारी कामे पाहाण्यासाठी नागरिकांनाही या सॉफ्टवेअरमध्ये ऍक्सेस देण्यात येणार आहे.
नागरिकांना त्यांची मते मांडण्यासाठी व फीड बॅक मिळण्याची सोयही सॉफ्टवेअरमध्ये करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किमान ९० टक्के कामांतील पुनरावृत्ती टळणार असून सार्वत्रिक विकासास मदत होईल, असा विश्‍वास वाटतो.

 

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.

 

 

Web Title :- Pune Corporation | To avoid repetition of works like roads, sidewalks, poles, drainage Pune Municipal Corporation to use GIS based ‘Integrated Work Management System’ – Vikram Kumar, PMC Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mouni Roy Beach Photo | मौनी रॉयनं समुद्र किनाऱ्यावर असा ड्रेस घालून केला कहर, हॉट फोटोनं चाहते झाले घायाळ..

 

Atul Londhe | ‘नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले, विदर्भाला विसरले’ – अतुल लोंढे

 

Narayan Rane | अधिश बंगल्याबाबत नारायण राणे यांना मोठा दिलासा, जाणून घ्या नेमकं काय झालं