Pune Court News | बालकाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court News | बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पातील प्रवेशद्वाराची कमान कोसळून सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामप्रवेश राध्येश्याम राय या ठेकेदारावर लोणीकंद पोलीस ठाण्यात आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी रामप्रवेश राय याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी जामीन मंजूर केला आहे.(Pune Court News)

अर्णव मिथिलेश राय (वय ७, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील मिथिलेश रामबच्चन राय यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी साडेचार वाजता घडला होता.

आरोपीने ॲड. तनवीर जहागीरदार यांच्या मार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना ॲड. जहागीरदार यांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात दिवाणी
व फौजदारीचा वाद आहे. त्यामुळे आरोपीला या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.
आरोपीने यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच गुन्हा केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करुन सुटका करावी असा युक्तीवाद केला. याला सरकारी पक्षाकडून विरोध करण्यात आला.

न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी रामप्रवेश राय याचा जामीन मंजुर केला.
या प्रकरणात ॲड. तनवीर जहागीरदार यांना ॲड. ताहिर खान, ॲड. इम्रान शेख, ॲड. रईस खान यांनी मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”