Pune Crime | अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशीप मिळवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला 10 लाखांना गंडा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुजरातमधील आनंद येथील अमूल डेअरी (Amul Dairy) ही देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचाच गैरफायदा घेत आनंद येथील सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एका ज्येष्ठ नागरिकाला अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी (Distribution Franchise) देण्याचा बहाणा करुन तब्बल 10 लाख 42 हजार रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यासाठी सायबर चोरट्यांनी आनंद येथील इंडियन बँकेच्या खात्याचा (Indian Bank Account) वापर केलेला (Pune Crime) आढळून आला आहे.
याबाबत एका 69 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरटा व बँक खातेधारकांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 3 ऑगस्ट ते 3 सप्टेबर दरम्यान घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन अमूल डेअरी डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याचा बहाणा केला.
त्यासाठी त्यांच्या पतीला वेगवेगळी कारणे सांगून त्यांना बँक खात्यावर पैसे पाठवायला सांगितले.
गुजरातमधील आनंद (Anand in Gujarat) येथे अमूलचा मुळ उद्योग आहे.
त्यामुळे तेथील इंडियन बँक खात्यात पैसे भरायला सांगितल्याने फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास बसला.
अशा प्रकारे त्यांनी एका महिन्यात तब्बल 10 लाख 42 हजार रुपये भरले.
तरीही त्यांच्याकडून मागणी होत असल्याने फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस निरीक्षक सातपुते (Police Inspector Satpute) अधिक तपास करीत आहे.
Web Title :- Pune Crime | 10 lakhs extorted from a senior citizen on the pretext of getting distributionship of Amul Dairy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना