Pune Crime | अंगावर वीज पडून 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

पुणे / वडगाव-मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बैलपोळा (Bail Pola) असल्याने 14 वर्षाचा मुलगा बैल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर वीज पडल्याने (thunderstorm) त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) वडगाव मावळ (Wadgaon Maval) येथे घडली. या घटनेमुळे वडगाव मावळसह पुणे जिल्ह्यात (Pune News) हळहळ व्यक्त होत आहे. राज भरत देशमख Raj Bharat Deshmukh (वय-14) असे या घटनेत मृत्यू (Death) झालेल्या मुलाचे नाव आहे.

वडगाव पोलिसांनी (Wadgaon Maval Police Station) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.6) बैल पोळा असल्याने मंगळवारी (दि.5) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राज बैल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी वीज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने राजचे वडील भरत देशमुख यांनी जाऊन पाहिले. त्यावेळी खांडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली राज पडलेला दिसला.

भरत देशमुख यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या कानातून व नाकातून रक्त आले होते. तर डोक्यावरचे केस जळाले होते.
घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे (Wadgaon Police Station) पोलीस निरीक्षक विलास भोसले (Police Inspector Vilas Bhosale),
उपनिरीक्षक विजय वडोरे (PSI Vijay Vadore), किरण नांगरे, सिद्धार्थ वाघमारे, सचिन काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वीज पडल्याचे लक्षात येताच राजला कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Kanhe Phata) उपचारासाठी दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत (Pune Crime) घोषीत केले.

 

कुटुंबाला 4 लाखांची नुकसान भरपाई

नायब तहसीलदार रावसाहेब चाटे (Tehsildar Raosaheb Chate) यांनी सांगितले, आम्ही या घटनेचा पंचनामा केला आहे.
शासकीय अहवाल राखून ठेवला आहे. तो अहवाल प्राप्त होताच शासनाच्या वतीने कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

Web Title :- Pune Crime | 14 year old boy electrocuted and died spot wadgaon maval of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर ! सणापूर्वी कमी झाला सोन्याचा दर, सर्वोच्च स्तरापासून मिळतंय 10582 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

Kirit Somaiya | अजित पवारांनी ‘जरांडेश्वर’च्या मालकाचे नाव घोषित करावे, किरट सोमय्यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 117 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी