Pune Crime | गुन्हे शाखेकडून 16 लाखांचे चरस जप्त, परराज्यातील दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये चरस (Charas) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन परराज्यातील आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 16 लाख 32 हजार रुपये किमतीचे 1 किलो 88 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई (Pune Crime) सोमवारी (दि.2) ताडीवाला रोड (Tadiwala Road) येथे करण्यात आली.

 

अमीर मसिउल्ला खान (वय-24 रा. ताडीवाला रोड, मुळ रा. गंज दुडवारा, जि. कासगंज, उत्तर प्रदेश), अतुल गौतम वानखेडे (वय-22 रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रोड, मुळ रा. तथागत नगर, ता. खामगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. ताडीवाला रोड येथे दोन जण के.टी.एम (KTM) दुचाकीवर संशयित रित्या बसलेले आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता 16 लाख 32 हजार रुपये किमतीचा 1 किलो 88 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चरस, 1 लाख 50 हजार रुपयांची दुचाकी, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 18 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशी दरम्यान विक्रीसाठी चरस बाळगल्याची कबुली दोघांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.डी नरके (PSI S.D. Narke) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Add CP Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), एस.डी. नरके पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, संदिप जाधव, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, साहिल शेख, आझीम शेख, दिशा खेवलकर व दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 16 lakh worth of hashish seized by crime branch, two foreigners arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप