Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात गुन्हे शाखेकडून 20 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell, Pune) अटक केली. त्यांच्याकडून 20 किलो 215 ग्रॅम वजनाचा गांजा (Marijuana), अ‍ॅटो रिक्षा, मोबाईल, असा एकूण 5 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (Pune Crime) माळवाडी परिसरात शनिवारी (दि.2) करण्यात आली.

 

सागर विलास शिंदे Sagar Vilas Shinde (वय – 36 रा. मंगळवार पेठ) आणि गुलटेकडी इंदिरानगर येथील 74 वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (N. D. P. S. Act) अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad) हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी क्रोम मॉल समोरील सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती अ‍ॅटो रिक्षा मधून गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून रिक्षावर छापा टाकला. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन रिक्षाची तपासणी केली असता 20 किलो 215 ग्रॅम गांजा आढळून आला. आरोपींकडून गांजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची बुधवार (दि.6) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
पोलीस अंमलदार मनोज साळुंखे, मारुती पारधी, संदीप जाधव, राहुल जोशी, संदिप शिर्के, विशाल दळवी, नितेश जाधव,
रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 20 kg cannabis seized from Crime Branch in Warje Malwadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा