Pune Crime | पुण्यात बॅडमिंटनपटू काश्मिरा भंडारीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला (Garbage Truck) ओव्हरटेक (Overtake) करणं पुण्यातील (Pune Crime) एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना, डाव्या बाजूला आधीपासून एक चारचाकी गाडी पार्क केलेली होती. त्यामुळे दुचाकीवरील तरुणीने अचानक ब्रेक दाबला. त्याचवेळी तरुणी ट्रकच्या चाकाखाली पडली. ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेल्याने तिचा मृत्यू (Death) झाला. हा थरारक अपघात पुण्यातील (Pune Crime) लक्ष्मीनारायण चौकात (Laxmi Narayan Chowk) बुधवारी सकाळी झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला आहे.

काश्मिरा प्रशांत भंडारी Kashmira Prashant Bhandari (वय-20) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. काश्मिरा ही पुण्यातील (Pune Crime) प्रसिद्ध फटाके व्यापारी (Famous Firecracker Trader) प्रशांत भंडारी यांची कन्या होती, असे वृत एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे. मयत काश्मिरा ही एक गुणवंत बॅडमिंटनपटू (Badminton Player) होती. तिने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये (State Level Competition) सहभाग घेतला होता. अशा एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काश्मिरा सुरज गार्डन (Suraj Garden) येथून काही कामानिमित्त लक्ष्मीनारायण चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होती.
त्यावेळी तिच्या पुढे एक कचऱ्याचा ट्रक होता.
त्यावेळी काश्मिराने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
पण डाव्या बाजूला आधीच एक चारचाकी गाडी पार्क केली होती.
त्यामुळे तिला डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करता आले नाही.
त्यामुळे तिने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरली आणि काश्मिरा थेट ट्रकखाली (Pune Crime) पडली.
आणि काही क्षणात ट्रकने काश्मिराला चिरडलं. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title :-  Pune Crime | 20 years old badminton player Kashmira Prashant Bhandari died in road accident while overtake in pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे किती दिवसांनी जाणवते? WHO ने सांगितले – ‘अशी करा आपली इम्युनिटी बूस्ट’

 

EPFO | 22.55 कोटी खातेधारकांच्या खात्यात पाठवले व्याजाचे पैसे, ताबडतोब असे तपासा तुम्हाला मिळाले किंवा नाही ?

 

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा होणार मुसळधार पावसासह गारपीट?, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘हाय’ अलर्ट