Pune Crime | वाहन चोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) महागड्या दुचाकी चोरणाऱ्या (Bike thieves) गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त केल्या आहे. ही कारवाई मुंबई महामार्गावरील आम्रपाली हॉटेल जवळ करण्यात आली. आरोपीने पुण्यातील (Pune Crime) कोथरुड परिसरातून दुचाकी चोरल्या आहेत.

अक्षय आप्पा गायकवाड (वय-19 रा. शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना एक वाहन चोर मुंबई महामार्गावर (Mumbai Highway) उभारला असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याच्याकडे असलेली पल्सर दुचाकी कोथरुड येथून चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 95 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करुन कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) दाखल असलेले चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale), पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 4 bikes seized vehicle theft pune police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘लस नाही तर प्रवेश नाही’, अजित पवारांचा पुण्यात मोठा निर्णय

Covaxin-Covishield Vaccines | ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ लशीचा ‘कॉम्बो’; 4 पट वाढवतो अँटीबॉडी प्रतिक्रिया

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवुन 40 लाखाची फसवणुक; पुणे पोलिसांकडून दांपत्यास अटक

Shani Gochar 2022 | शनि साडेसातीचा काळ सुरू होतोय; ‘या’ राशीच्या लोकांना व्हावं लागेल अलर्ट