Pune Crime | 46 वर्षीय प्रौढाचे 35 वर्षीय विवाहीतेशी 7 वर्षांपासून प्रेमसंबंध ! ब्रेकअपनंतर पतीच्या मोबाईलवर ‘डर्टी पिक्चर’ पाठवून केली बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ७ वर्षांपासून प्रेमसंबंधानंतर (Love Affair) ब्रेकअप झाल्याच्या (Breakup) रागातून तरुणाने महिलेच्या पतीच्या मोबाईलवर अश्लिल फोटो पाठवून विनयभंग (Molestation Case) केला. हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अलंकार पोलिसांनी Alankar Police कार्तिक सतिश पिंगे Karthik Satish Pinge (वय ४६, रा. टिर्निटी कोर्ट, कोरेगाव पार्क – Koregaon Park) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कर्वेनगरमधील (Karve Nagar) एका ३५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५१/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मागील ७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
सध्या फिर्यादी आणि आरोपी यांनी यापुढे कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, असे मागील ४ दिवसांपूर्वी ठरले होते.
हा ब्रेकअप झाल्याच्या रागातून कार्तिक पिंगे हा फिर्यादीला सतत व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज (Whatsapp Message) करत होते.
फिर्यादी यांनी त्याला रिप्लाय न दिल्याने त्याने फिर्यादी यांचे पतीचे मोबाईलवर अश्लिल फोटो पाठवून विनयभंग केला. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 46 year old adult in love with 35 year old married woman for 7 years After the breakup he sent a dirty picture on her husbands mobile phone Molestation Case alankar police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा