Pune Crime | तरुणाच्या दक्षतेमुळे 5 वर्षाची चिमुरडी वाचली अत्याचारापासून; येरवड्यातील घटना, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आईबरोबर झोपलेल्या ५ वर्षाच्या मुलीला त्या नराधमाने उचलून नेले. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथून जाणार्‍या एका तरुणाने मुलीचा रडण्याचा आवाज ऐकला. वेळीच मुलगी का रडते, हे पाहण्यासाठी तो गेला असताना त्याला समोर हे दृश्य दिले़ त्याने त्या नराधमाला पकडून मुलीला अत्याचारापासून वाचविले. (Pune Crime)

 

राम टेकबहादूर (वय ३५, रा. हरीनगर, वडगाव शेरी) असे या नराधमाचे नाव असून येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) त्याला अटक केली आहे़ ही घटना येरवड्यातील ट्रम्प टॉवरसमोरील (Trump Tower Pune) मोकळे मैदानातील बंद पडलेल्या बांधकामाच्या बेसमेंटजवळ शनिवारी रात्री अकरा वाजता घडली. याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५५५/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला दिवसभर फुगे विकून रात्री आपल्या तीन मुलींसह या बंद पडलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये झोपल्या होत्या.
त्यावेळी आरोपीने त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीला त्यांच्या जवळून झोपेतून उचलून घेऊन गेला.
काही अंतरावर त्याने या मुलीच्या अंगावर पडून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे मुलीला जाग आली.
ती मोठ्याने रडू लागली. तेव्हा त्या ठिकाणाहून नवनाथ अडागळे हा तरुण जात होता.
त्याने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. इतक्या रात्री अशा एकाकी जागी मुलगी का रडत आहे,
याचे कुतुहल वाटल्याने त्याने तिकडे जाऊ पाहिले असता हा नराधम तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता.
त्यांनी या नराधमाला पकडले. नवनाथ अडागळे याच्या दक्षतेमुळे एक चिमुरडी अत्याचारापासून वाचली. पोलीस उपनिरीक्षक गाताडे अधिक तपास करीत आहेत. (Pune Crime)

 

Web Title :- Pune Crime | 5 year old girl saved from abuse due to youth’s vigilance; Incident in Yerwada, one arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शेकोटीवरुन अल्पवयीन मुलांनी टपरी व्यावसायिकाचा पालघनने वार करुन केला खून; खडकीतील घटना

Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत