Pune Crime | खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ लक्झरी बसमधून 6 किलो चरस जप्त, राजगड पोलिसांकडून तरुणाला एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) मुंबई-बंगळूर महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास राजगड पोलिसांनी (Rajgad police station) केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 6 किलो चरस (charas) जप्त करण्यात आले आहे. आरोपीने हे चरस त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये लपवून ठेवले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एका नेपाळी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात (Pune Crime) करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मुस्ताकी रजाक धुनिया Mustaki Razak Dhunia (वय-30 रा. नेपाळ) याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे. राजगड पोलिसांनी ही कारवाई मुंबईहून गोव्याला (Mumbai to Goa) निघालेल्या डॉल्फिन ट्रॅव्हल्समध्ये (Dolphin Travels) केली. डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे (Rajgad Police Station) पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांना समजली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे राजगड पोलिसांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्यावर (khed-shivapur toll plaza) सापळा रचला. टोल नाक्यावर एक संशयित लक्झरी बस बाजूला घेऊन तपासणी केली असता यातील धुनिया याच्याकडे चरस आढळून आले. त्याच्याकडून सुमारे 32 लाख रुपये किमतीचे सहा किलो चरस जप्त केले आहे. याप्रकरणी धुनिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (Sub-Divisional Police Officer Dhananjay Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अवसरे (API Manoj Avsare),
पोलीस उप निरीक्षक श्रीकांत जोशी (PSI Shrikant Joshi), निखिल मगदूम, पोलीस हवलदार संतोष तोडकर,
सोमनाथ जाधव, पी.एस. निकम, अजित माने, भगीरथ घुले, नाना मदने यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | 6 kg charas seized from luxury bus near Khed-Shivapur toll gate, Rajgad police arrested a youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्याच्या मोहम्मदवाडीत भरदिवसा झाडे उखडून टाकण्याचा प्रकार; समाजकंटकांविरुद्ध कारवाईची नागरिकांची मागणी

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द ज्वेलर्सकडे ED व SFIO च्या नावाने 50 लाखाच्या खंडणीची मागणी; रूपेश चौधरी, अमित मिरचंदाणी यांच्यासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime | 21 वर्षीय महिलेचं पतीच्या मित्राशी ‘जुळलं’, पत्नीनं त्याच्याशी ‘झेंगाट’ असल्याचं नवर्‍याला सांगितलं, नंतर ‘लफडं’ पोलिसांपर्यंत गेलं