×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | गुंतवणुकीवर मासिक ५ टक्के परतावा देण्याच्या अमिषाने २ कोटींची...

Pune Crime | गुंतवणुकीवर मासिक ५ टक्के परतावा देण्याच्या अमिषाने २ कोटींची फसवणूक करणार्‍या सागा असोशिएटच्या संकल्प आखरेवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | बांधकाम व्यवसायाशी (Construction Business) निगडीत सेवा पुरविण्याच्या व्यवसायात गुंतवणुक (Investment) केल्यास मासिक ५ टक्के परतावा देण्याची आमिष दाखवून तब्बल २ कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या सागा असोशिएटच्या (Saga Associates) संचालकांवर फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

संकल्प आखरे (Sankalp Akhare), सुधाकर आखरे (Sudhakar Akhare), स्रेहल आखरे (Snehal Akhare), युगा शिरुडे (Yuga Shirude), सागर शिरुडे Sagar Shirude (सर्व रा. सुस रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी दीपक विनोदराव उगले Deepak Vinodrao Ugale (वय ४१, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ३६६/२२) दिली आहे. हा प्रकार १८ मार्च २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ते सागा असोशिएट या कंपनीचे संचालक असल्याचे सांगून
ते बांधकाम व्यवसाय, इंटिरिअर डिझायनिंग (Interior Designing), बांधकाम व्यवसायाशी निगडीत सेवा
पुरविण्याचा व्यवसाय करतात, असे सांगितले.
फिर्यादी व त्यांचे इतर नातेवाईक मित्रांचा विश्वास संपादन त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास मासिक ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.
त्यांच्याकडून २ कोटी ३ लाख २४ हजार ५९१ रुपयांच्या ठेवी घेतल्या.
त्या गुंतवणुकीवर त्यांना त्यांनी ७१ लाख ९४ हजार ९१८ रुपये एवढी रक्कम परतावा म्हणून दिली.
मात्र गुंतवणुक केलेली २ कोटी ३ लाख २४ हजार रुपये रक्कम परत न देता फिर्यादी,
त्यांचे नातेवाईक व मित्रांची फसवणुक (Cheating Case) केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सावंत (Sub-Inspector of Police Sawant) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case has been registered against Saga Associate’s Sankalp Akhre, who defrauded Saga Associates of Rs 2 crore by promising 5% monthly return on investment.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 755 कोटींची मदत जाहीर

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, शिंदेंचे नेतृत्व माना…अन्यथा तुमची शिवसेना…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News