Pune Crime | नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन मागितली २५ लाखांची खंडणी; आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | तुम्ही बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) केले असून तुमचे नगरसेवकपद घालवितो. आगामी निवडणुकीत तुमची सोशल मीडियावर (Social Media) बदनामी करतो, अशी धमकी देऊन नगरसेविकेच्या पतीकडे २५ लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागणार्‍या आरटीआय कार्यकर्त्यावर (RTI Activist) खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

जितेंद्र अशोक भोसले Jitendra Ashok Bhosle (रा. विमाननगर) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.
जितेंद्र भोसले याच्यावर यापूर्वी खंडणीचे ३ व इतर ३ गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी विमाननगर येथील एका ४५ वर्षाच्या नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३७/२२) दिली आहे. हा प्रकार ३० जुलै २०२० ते २५ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.
(Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र भोसले हा माहिती अधिकारात माहिती काढून त्याद्वारे लोकांना
ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो.
फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले असल्याबाबत त्याने पुणे महापालिका
(Pune Municipal Corporation) व पीएमआरडीए (PMRDA) येथे तक्रारी करुन नगरसेवक पद रद्द करण्याबाबत खोटे अर्ज केले होते.
त्याच्या अर्जाची चौकशी होऊन अशा प्रकारे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता.
त्यानंतरही महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.
२५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून त्याने २५ लाख रुपये मागितले. त्याबाबत त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही.
त्यानंतर त्यांनी आता खंडणी विरोधी पथकाकडे (Anti Extortion Squad) तक्रार केली.
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (PI Balaji Pandhare) यांनी त्यांच्या अर्जाची चौकशी करुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A corporator was blackmailed and demanded an extortion of 25 lakhs; Extortion case filed against RTI activist

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणपती विसर्जन मुसळधार पावसात; हवामान खात्यानं नेमकं काय म्हटलं?

Gulabrao Patil | मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वादग्रस्त सल्ला; म्हणाले – ‘मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा’

Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी

Pune PMPML Employees | पीएमपीएमएल कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास….