Pune Crime | पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या युगलाला मारहाण करुन लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सुस खिंडीतील टेकडीवर (Sus-Khind News) फिरायला गेलेल्या एका युगलाला तिघा चोरट्यांनी हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन (Couple threatened to kill) त्यांच्याकडील 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने (Pune Crime) चोरुन नेला.

 

याप्रकरणी चिंचवड येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. ही घटना सुस खिंडीतील (sus pune) टेकडीवर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली.

 

फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेले होते. यावेळी तिघे जण तेथे आले.
त्यांनी या दोघांना थांबवून फिर्यादी यांना हाताने व लाकडाने मारहाण (Pune Crime) केली.
त्यांच्या मैत्रिणीच्या कानाखाली जोरात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली.
मैत्रिणीकडील २५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपयांचे दागिने, २ मोबाईल, चांदींची आंगठी,
२ हजार ३०० रुपये, पाकिट, त्यातील आधार कार्ड (Aadhaar Card) , पॅन कार्ड (Pan Card),
ड्रायव्हीग लायसन (driving licence) असा १ लाख ७ हजार ३५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
सहायक पोलीस निरीक्षक कोळी (API Koli) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A couple who went for a walk on the sus khind of Pune was beaten and robbed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune | हॉटेल वैशालीचे जगन्नाथ शेट्टी यांचे निधन; पुण्यातील रेस्टॉरंट व्यवसायाचा ‘अग्रणी’ हरपला

Jeevan Pramaan – Life Certificate | जर तुम्ही सुद्धा घेत असाल पेन्शन तर ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Monalisa | श्रीदेवीच्या गाण्यावर मोनालिसाचा जलवा, ‘हवा-हवाई’ या गाण्यावर नाचून चाहत्यांचं जिंकलं मन.