Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यांचे अपहरण; नातेवाईकांकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक; 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलीस (Pune Police Crime Branch) असल्याची बतावणी करुन सिलेंडर डिलिव्हरी (Cylinder Delivery) करणाऱ्याचे अपहरण (Kidnapping) केल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी मंदिरासमोर (Chattushringi Mandir) 15 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 च्या दरम्यान घडला होता. आरोपींनी अपहरण केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करुन दोन लाख रुपयांची खंडणी (Ransom) घेतली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Crime Branch Unit 2) पथकाने तिघांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई आंबेगाव येथील दत्तनगर (Pune Crime) परिसरात केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

सतिश सुधीर वांजळे Satish Sudhir Wanjle (वय-33 रा. दत्तनगर, आंबेगाव बु), विकास तुकाराम कोडीतकर Vikas Tukaram Koditkar (वय-30 रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, अंजुमण मशिद समोर, पुणे), सुदर्शन किशोर गंगावणे Sudarshan Kishor Gangavane (वय-25 रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत सिलेंडर डिलेव्हरी करणाऱ्या व्यक्तीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे 15 मार्च रोजी गॅस सिलेंडरचा टेम्मो घेऊन जात होते. त्यावेळी चतु:श्रृंगी मंदिरासमोर एका कारमधून आलेल्या चार जणांनी व दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फिर्यादी यांचा टेम्पो आडवला. आरोपींनी आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत, तुम्ही ब्लॅकने गॅस सिलेंडर विकता तुमच्यावर केस दाखल करावी लागेल, केस नको असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील. तसेच पैसे दिले नाही तर जेलची (Jail) हवा खावी लागेल. नाहीतर तुमचे हातपाय तोडून जीवे मारून टाकू अशी धमकी (Threats to Kill) दिली. यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या साथिदाराला जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांच्या खिशातील 4500 रुपये आणि मोबाइलवरुन 3 हजार रुपये काढून घेतले. यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या नातेवाईक (Relatives) आणि ओळखीच्या लोकांना फोन करुन पैशांची मागणी केली. घाबरलेल्या नातेवाईकांनी दोन लाख रुपये आरोपींना दिल्यानंतर त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साथिदाराला सोडून दिले.

यानंतर फिर्यादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. तसेच विश्वनाथ गॅस एजन्सी (Vishwanath Gas Agency) मध्ये काम करणारा व मालकांनी कामावरुन काढून टाकलेल्या मुकेश उर्फ मंगीलाल याच्यावर संशय व्यक्त केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, अपहरण प्रकरणातील आरोपी दत्तनगर आंबेगाव (Duttnagar Ambegaon) येथे वेरना कारमधून येणार आहेत. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून सतिश वांजळे आणि विकास कोडीतकर यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सुदर्शन गंगावणे याचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली.

 

पोलिसांनी आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई वेरना कार, होंडा युनिकॉर्न दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 17 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयीत आरोपी सतिश वांजळे याच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) 2009 मध्ये खुनाचा (Murder) गुन्हा दाखल आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (API Ratnadeep Gaikwad) करत आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, किशोर वग्गु,
समीर पटेल, मितेश चोरमले, चंद्रकांत महाजन, कादीर शेख, अस्लम पठाण यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Abduction of cylinder delivery people claiming to be Pune Crime Branch police; Crime Branch arrests three for extorting ransom from relatives; 17 lakh worth of property confiscated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On ED And CBI | ‘पाकिटमारीचा तपास ईडी आणि CBI कडून व्हायचा बाकी’ – संजय राऊत

 

Pak PM Imran Khan | राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका?; सुरक्षेत केली वाढ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी