Pune Crime | महिला छेडछाड गुन्ह्यातील आरोपीला अटक पूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिलेला छेडछाड (Woman Molested) केल्याच्या आरोपातील एकाला पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावले (Additional Sessions Judge V.A. Patravale) यांनी अटकपूर्व जामीन मंजूर (Granted Anticipatory Bail) केला, अशी माहिती आरोपीचे वकील स्वप्निल जोशी (Advocate Swapnil Joshi) यांनी दिली. अजय नाईकनवरे (Ajay Naiknaware) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे (Pune Crime) नाव आहे.

 

पीडित महिलेने तिला आरोपीने आवाज दिला व तिच्याशी लगत करण्याचा प्रयत्न आरोपीने केला असा आरोप (Pune Crime) केला होता. आरोपीने न्यायालयात वकील स्वप्निल जोशी यांच्या मार्फत जमिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीचे वकील अॅड. स्वप्नील जोशी, विजय बाबर (Vijay Babar) यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपी 26 वर्षांचे तरुण आहे.

 

तसेच इतर एका आरोपीला जामीन मिळालेला आहे. आरोपीकडून कोणत्याही प्रकारची जप्ती करायची राहिलेली नाही.
तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अटी व शर्तींचे पालन केली जाईल तसेच साक्षीदाराला अडथळा किंवा संपर्क करणार नाही.
या गुन्ह्यात त्यांना खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

 

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.
यावेळी सर्व कामकाज आरोपीचे वकील स्वप्निल जोशी व विजय बाबर यांनी पाहिले.

 

Web Title :- Pune Crime | Accused in woman molestation case granted pre-arrest bail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता