Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Group | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने (BJP) धक्कातंत्र वापरण्यास सुरूवात केली असल्याचे दिसत आहे. मात्र, धक्का इतर कुणाला नसून शिंदे गटासाठीच आहे. शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटात आलेले स्टार प्रचारक सिनेअभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आमदार मंगेश कुडाळकर (MLA Mangesh Kudalkar) यांच्या सत्कार कार्यक्रमात दिगंबर नाईक उपस्थित होते. (Eknath Shinde Group)

 

या सत्कार कार्यक्रमात दिगंबर नाईक यांनी म्हटले होते की, माझे एकनाथ शिंदे यांच्याशी 30-35 वर्ष जुने संबंध आहेत. आपला माणूस मुख्यमंत्री होत असेल तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आलोय. शिवसेनेत नऊ वर्षापासून मी स्टार प्रचारक आहे. निवडणुकीत अनेक सभा गाजवल्या. शिंदे गटाला पाठिंबा देण्यापूर्वी मला शिवसेनेतून अनेक नेत्यांचे फोन आले होते. (Eknath Shinde Group)

 

शिंदे गटाला पाठिंबा देताना दिगंबर नाईक म्हणाले होते, एकनाथ शिंदे हे आपलेसे वाटणारे नेते आहेत. मी शिवसेनेतच आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची कास धरणारे आम्ही सगळे आहोत. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेतून मी शिवसेनेत आलो. त्यामुळे जिथे हिंदुत्व तिथे मी असेन.

शिंदे गटात आलेले दिगंबर नाईक शिंदे गटात अस्वस्थ असल्याचे वृत्त आहे.
काही दिवसांपूर्वी दिगंबर नाईक भाजपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात दिगंबर नाईक यांनी उपस्थित राहून गार्‍हाणे मांडले होते.
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भरपूर कौतुक केले होते.
आता ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दिगंबर नाईक मालवणी भाषेत गार्‍हाणे घालण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत.
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे ते मित्र आहेत.

 

दिगंबर नाईक हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते.
ते निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ते काम करायचे.
मात्र तेच शिंदे गटात अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Group | shivsena shinde group star campaigner digambar naik may join bjp eknath shinde is likely to get shocked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई