Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील (Punjabi Singer Sidhu Moose Wala Murder Case) संशयित संतोष जाधव (Santosh Jadhav) याच्यासह साथीदारांच्या विरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) (MCOCA Action) Mokka कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जाधवच्या साथीदारांनी नारायणगाव (Narayangaon) भागातील एका वॉटर प्लांट व्यावसायिकाला धमकावून 50 हजार रुपये खंडणी (Ransom) मागितली होती. याप्रकरणात विविध कालमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आत यामध्ये मोक्काचे कलम वाढवण्यात (Pune Crime) आले आहे.

 

संतोष सुनील जाधव Santosh Sunil Jadhav (रा. पोखरी, ता. आंबेगाव), जिवनसिंग दर्शनसिंग नहार Jivansingh Darshan Singh Nahar (रा. मंचर, ता. आंबेगाव), श्रीराम रमेश थोरात Shriram Ramesh Thorat (रा. मंचर), जयेश रतिलाल बहिरम Jayesh Ratilal Bahiram (रा. घोडेगाव), गणेश तारु (Ganesh Taru), वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे Vaibhav alias Bhola Shantaram Tiktare (रा. जळकेवाडी, चिखली), रोहित विठ्ठल तिटकारे Rohit Vitthal Titkare (रा. सरेवाडी, ता. खेड), जिशान इलाहिबक्श मुंढे Jishan Ilahibaksh Mundhe (रा. घोडेगाव), सचिन बबन तिटकारे Sachin Baban Titkare (रा. धाबेवाडी, ता. खेड) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

नारायणगावमधील एका व्यावसायिकाला संतोष जाधव याने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन तसेच साथिदारांना पाठवून 50 हजार रुपये खंडणी मागितली होती.
याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte)
यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया (Kolhapur Range Inspector General of Police Lohiya Lohia)
यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे (Sub-Divisional Police Officer Mandar Jawale) तपास करत आहेत.

हा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (LCB Police Inspector Ashok Shelke),
सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate), सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare),
पोलीस हवालदार महेश बनकर, शैलेश वाघमारे यांनी तयार केला.

 

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून 19 टोळ्या व
त्यात सामील असणाऱ्या 138 आरोपींविरुद्ध दाखल असणाऱ्या गुन्ह्यांना मोक्का अंतर्गत कलम वाढ केली आहे.
तसेच 28 गुन्हेगारांना तडीपार केले आहे. तर 12 जणांवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (MPDA Act) स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

 

Vegetables For Cholesterol | कोलेस्ट्रॉल शोषून घेऊन रक्त वाहिन्यांना स्वच्छ आणि मजबूत बनवू शकतात ‘या’ 5 भाज्या

 

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल