Pune Crime | भांडणे करु नको, असे सांगितल्याने मित्रानेच कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असताना वादावादी सुरु असल्याचे पाहून त्याने ओळखीच्या मित्राला वाद घालून भांडणे करु नका, असे सांगितल्याच्या रागातून कोयत्याने डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्यात आला. (Pune Crime)

 

याप्रकरणी प्रकाश नामदेव गुजर Prakash Namdev Gujar (वय ४८, रा. गुजरवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७०/२२) दिली आहे. त्यावरुन अक्षय जाधव (Akshay Jadhav) (रा. अंजनीनगर, कात्रजगाव) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी व त्यांचा मित्र ७ ऑक्टोंबरला दुपारी हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तेथे फिर्यादी यांच्या ओळखीचा अक्षय जाधव याचे दुसर्‍याबरोबर भांडणे चालू होती. त्यावेळी फिर्यादीने त्यास वाद घालतोस भांडणे करु नका, असे बोलला. त्याचा राग अक्षय मनात ठेवून होता. जेवण करुन ते कात्रज भाजी मंडईसमोरील सार्वजनिक रोडवर आले असताना अक्षय हातात कोयता घेऊन आला.
त्याने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केला. तो फिर्यादीने हुकवला.
तो वार उजव्या खांद्यावर लागून जखम झाली. दुसरा कोयत्याचा वार डोक्यात लागू नये, म्हणून फिर्यादी याने हात मध्ये घातला.
तेव्हा तो मनगटावर बसून हाड फॅक्चर झाले. “मी कात्रजचा भाई आहे. माझ्याविरुद्ध कोणी पोलिसांना काहीही सांगितले तर त्यांना जीवंत सोडणार नाही,”
असे म्हणून कोयता हवेत फिरवून दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector of Police Jadhav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | After telling him not to fight, the friend tried to kill him by stabbing him with a knife; Bharti University campus incident crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP | राष्ट्रवादीने भाजपाला दिला सूचक इशारा, खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो

Shivsena | उद्धव ठाकरे यांच्यासमोर ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय, निवडणूक आयोगाकडे दावा करणार

NCP Chief Sharad Pawar | मागील काही दिवस वाचत होतो, ते घडलं, पण…, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया