NCP Chief Sharad Pawar | मागील काही दिवस वाचत होतो, ते घडलं, पण…, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri-East assembly by-Election) शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक आहे. याबाबत न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. आयोगाच्या निर्णयावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आज औरंगाबाद दौऱ्यावर असून ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, निर्णय हे गुणवत्तेवरुन घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो किंवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे पवार म्हणाले.

 

शरद पवार पुढे म्हणाले, आता नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. असा आता शिवसेनेकडे पर्याय आहे. मी स्वत: पाहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर लढलो होतो. दुसरी निवडणूक गाय-वासरु या चिन्हावर लढलो होतो. तिसऱ्या निवडणुकीत चिन्ह चरखा होता. चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: लढलो आहे. आणि त्याचा काही फायदा होत नाही, लोक ठरवतात.

शिवसेना संपणार नाही
शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील.
या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहीच कारण नाही.
आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे.
हे कायम एकत्र राहतील, यात काहीच शंका नाही.
आता जी पोटनिवडणूक आहे त्या निवडणुकीला काँग्रेसने पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawars reaction on election commissions decision regarding shivsenas symbol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T-20 World Cup | भारताला आणखी एक धक्का! ‘हा’ मध्यमगती गोलंदाज दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

MS Dhoni | धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहत्यांकडून संताप

IND vs SA 2nd ODI | द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘हा’ खेळाडू घेणार दीपक चहरची जागा