Shivsena | उद्धव ठाकरे यांच्यासमोर ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय, निवडणूक आयोगाकडे दावा करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (Shivsena) निवडणूक चिन्हावरुन (Election Symbol) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचला. न्यायालयाने शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. आयोगाने काल दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत रात्री उशिरा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवलं. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटाकडून नव्याने चिन्हाचा शोध सुरु आहे. शिवसेना सध्या तीन चिन्हावर विचार करत आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं (Shivsena) पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. तसेच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामुळे आता दोन्ही गटाला ‘ठाकरे गट’ (Thackeray Group) आणि ‘शिंदे गट’ (Shinde Group) ही नावे वापरावी लागणार आहेत. पण पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आता बदलावे लागणार आहे.

 

ठाकरे गटाकडून तीन पक्ष चिन्हांचा विचार केला जात आहे. उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या तीन चिन्हांचा विचार उद्धव ठाकरे गट करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या (सोमवार) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) या तीन चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

 

दिल्लीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट, निवडणूक चिन्ह आणि नवीन नावावर निर्णय घेण्यासाठी बैठक पार पडली.
पहाटे तीन वाजेपर्यंत शिवसेना नेते, कायदे तज्ञ आणि सुप्रीम कोर्टातील वकिलांसोबत बैठक झाली.
या बैठकीनंतर नावा संदर्भात तीन प्रस्ताव तयार करण्यात आले असून आज मुंबईत होणाऱ्या
बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Shivsena | shivsena now has 3 options for party symbol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T-20 World Cup | भारताला आणखी एक धक्का! ‘हा’ मध्यमगती गोलंदाज दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

MS Dhoni | धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहत्यांकडून संताप

IND vs SA 2nd ODI | द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘हा’ खेळाडू घेणार दीपक चहरची जागा