Pune Crime | एटीएम फोडणारी टोळी यवतमध्ये जेरबंद; यु-ट्युबवरून घेतली माहिती, गुन्ह्यासाठी साहित्य मागवले ऑनलाईन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तीन दिवसांपूर्वी यवत गावाशेजारील महाराष्ट्र बँकेचे (Bank Of Maharashtra) एटीएम चोरट्यांनी फोडून 23 लाख 80 हजार 700 रुपये पळवले होते. आज या आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना (Pune Rural Police) यश आले आहे. आरोपींनी दिलेली कबुली ऐकून पोलिस देखील चक्रावले असून या गुन्हेगारांनी एटीएम कसे फोडायचे आणि घरफोडी कशी करायची याची माहिती यु-ट्यूबवरून् (YouTube) घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे हा गुन्हा करण्यासाठी आरोपींनी साहित्य त्यांनी ऑनलाईन मागवले होते. (Pune Crime)

 

एकुण पाच आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून दोघोजण अद्याप फरार आहे. अजय रमेशराव शेंडे (32, रा. सहजपूर, ता. दौंड), शिवाजी उत्तम गरड (25, रा. करंजी, पो. ता. सिसोड, जि. वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (22, रा. देवधानुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

आरोपींकडून 10 लाख रुपये, मोटारसायकल, गॅस कटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले, अशी माहिती ही माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

आरोपींनी 17 जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान यवतमध्ये एटीएमवर दरोडा टाकला होता. तर 16 जानेवारीला कुरकुंभ (Kurkumbh) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (SBI ATM) फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

 

एटीएम दरोड्यातील (ATM robbery) आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) व त्यांच्या पथकाने या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी (CCTV) केली असता दोन – तीन मोटारसायकलवरुन आरोपी जाताना आढळले.

चार गुन्हे उघडकीस आले
यापैकी एका मोटारसायकलच्या मागे गॅस सिलेंडर लावलेला दिसून आला. त्यावरुन शोध घेऊन पोलिसांनी या तिघांना पकडले आहे. यवत (yavat), कुरकुंभ आणि लातूर (Latur) जिल्ह्यातील गातेगाव (Gategaon) येथे या आरोपींनी एटीएम मशीन गॅस कटरने कापून 7 लाख 67 हजार रुपये पळवले असल्याचे उघडकीस आले. वाशीम (Washim) येथील घरफोडी करुन 1 लाख 84 हजार रुपयांचे 12 तोळे सोने व लॅपटॉप चोरुन नेले होते. हे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

यासाठी केली चोरी, आरोपींची कबुली
पोलिसांना दिलेल्या कबुलीत आरोपी ऋषिकेश किरतिके याने सांगितले की, त्याच्या भावाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला सोडविण्यासाठी वकिल व अन्य बाबींसाठी दीड लाख रुपये खर्च झाला होता. त्यामुळे तो या टोळीत सहभागी झाला होता. (Pune Crime)

 

तर दुसरा आरोपी अजय शेंडे हा सहजपूर येथे राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे.
तो 12 वी पास आहे. ऋषिकेश त्याच्याकडे कामाला होता.
तर शिवाजी गरड या आरोपीचीही अजय शेंडे सोबत कामानिमित्त ओळख झाली होती.

 

आरोपी गरड आणि शेंडेने एटीएम दरोड्याचा प्लॅन तयार केला. तर अजय शेंडेने यु ट्युबवरून घरफोडी,
एटीएम चोरी कशी करावी याची माहिती घेऊन, त्यानुसार लागणारे साहित्य ऑनलाईन मागवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
धक्कादायक म्हणजे मागील वर्षभरात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गेल्या वर्षभरात 14 एटीएम चोरट्यांनी फोडले आहेत.

 

Web Title :- Pune Crime | atm robbery gang arrested in yavat theft Pune rural police sp dr abhinav deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Dr. Amol Kolhe | नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण; म्हणाले – ‘यात काहीही लपवण्याचं कारण नाही…,’

 

Indian Currency | 1, 5 आणि 10 रुपयांच्या ‘या’ नोटा तुमच्या घरी पाडतील पैशांचा पाऊस, जाणून घ्या कसा

 

Minimum Balance Post office | पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या खात्यात किती असावा मिनिमम बॅलन्स? अन्यथा लागू शकते पेनल्टी; जाणून घ्या