Pune Crime | पुण्यात सराफी व्यवसायिकावर भरदिवसा हल्ला, दत्तनगरमधील थरार CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका सराफी व्यवसायिकावर भरदिवसा चाकुने हल्ला (Attack on Goldsmith) करुन दरोडा (Robbery) टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दत्तनगर जांभुळकरवाडी (Duttnagar Jambhulkarwadi) येथील दुकानात घडली आहे. हल्लेखोराच्या हल्ल्यात सराफ जखमी (Injured) झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसा ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असून पोलीस आरोपीचा (Pune Crime) शोध घेत आहेत.

 

हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात सराफ विनोदकुमार भागचंद सोनी Vinodkumar Bhagchand Soni (वय-  42 रा. आंबेगाव बुद्रुक) हे जखमी झाले आहे. सोनी यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

 

 

विनोदकुमार सोनी यांचे आंबेगाव बुद्रुक परिसरात वैभवलक्ष्मी ज्वेलर्स (Vaibhav Lakshmi Jewelers) सराफी पेढी आहे. सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्याने अचानक सोनी यांच्यावर चाकुने हल्ला (Knife Attack) चढविला. सोनी यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला. सोनी यांनी चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरटा सराफी पेढी समोर लावलेल्या वाहनातून पसार झाला आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | attack on goldsmith in Duttnagar Jambhulkarwadi pune capture thrill in cctv pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा