Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रियल इस्टेट व्यावसायिकावर हल्ला, 9 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवयास करणाऱ्या आणि प्लॉट डेव्हलप (Plot Development) करणाऱ्या व्यावसायिकाला 9 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण (Beating) केली. तसेच व्यावसायिकाच्या हॉटेलची (Hotel) तोडफोड करुन हॉटेलमधील मॅनेजर (Manager) आणि हॉटेलच्या पार्टनरला (Hotel Partner) मारहाण केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुणे सातारा रोडवरील (Pune Satara Road) पुणे जंक्शन हॉटेलमध्ये (Pune Junction Hotel) बुधवारी (दि.30) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी (Pune Police) 9 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

या घटनेमध्ये सिद्धार्थ अनिल कांबळे Siddharth Anil Kamble (वय – 28 रा. चंद्रकांत रेसिडेन्सी, मानीजी नगर, नऱ्हे), हॉटेल मॅनेजर ज्ञानेश्वर एैवळे (Dnyaneshwar Aivale), हॉटेल पार्टनर शंकर मुजुमले (Shankar Mujule) हे जखमी झाले आहेत. याबाबत सिद्धार्थ कांबळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष उर्फ आप्पा कोळपे (Santosh alias Appa Kolpe), बापू कोळपे (Bapu Kolpe), बंडू सुरेश कोळपे Bandu Suresh Kolpe (सर्व रा. मु.पो. जांभळी भोर) यांच्यासह 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कांबळे यांचा रियल इस्टेटचा (Real Estate) व्यवसाय आहे. ते प्लॉट खरेदी विक्रीचा व्यावसाय करत असून प्लॉट डेव्हलप करुन त्याची विक्री करतात. कांबळे यांनी जांभळी नसरापुर (Jambhali Nasrapur) येथे प्रमोद जावळे (Pramod Jawale) यांचा 57 गुंठ्याचा प्लॉट घेतला आहे. याच कारणावरून आरोपींनी बुधवारी रात्री फिर्यादी यांच्या पुणे जंक्शन हॉटेलमध्ये येऊन जांभळी नसरापूर येथील प्लॉटमध्ये लक्ष का घालतो. अशी विचारणा करुन वाद घातला.

 

तसेच या प्लॉटमध्ये लक्ष घालू नको अशी धमकी (Threat) दिली.
आरोपींनी कांबळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर हॉकी स्टीकने (Hockey Sticks) बेदम मारहाण केली.
यावेळी हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलचे पार्टनर मध्ये आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच हॉटेल मधील सामानाची तोडफोड करुन नुकसान करुन पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर (API Kavathekar) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Attack on real estate professional in bharti vidyapeeth area FIR against 9 persons

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा