Pune Crime | वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटकांच्या गाडीवर हल्ला; मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांचे कृत्य CCTV कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अमित ऊर्फ साई वाघमारे (BVA Amit Waghmare) यांच्या घरासमोर पार्क केलेल्या कारवर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या. अमित वाघमारे यांना धमकाविण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अमित ऊर्फ साई प्रदीप वाघमारे (वय ३५, रा. शिवतीर्थ सोसायटी, मोशी प्राधिकरण) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची स्वीफ्ट कार (एमएच १४ – एच के २३३१) ही शिवरुद्र प्रोपर्टीज या वाघमारे यांच्या मोशीमधील ज्योती सोसायटी येथील कार्यालयाबाहेर पार्क केली होती. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी गाडीच्या समोरील काच दगड मारुन फोडली व गाडीचे काचेचे नुकसान केले आहे (Pune Crime). पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा अशी नोंद केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Attack on the vehicle of the District Organizer of the vanchit bahujan aghadi; CCTV captured the actions of the two who came from a motorcycle

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold In Iron Ore | काय सांगता ! होय, गोव्यात लोहखनिजातून निघतंय सोनं

 

Onion Oil Benefits | केस गळणे आणि कोंड्याच्या समस्येतून मुक्त करणार घरी बनवलेल्या कांद्याचं तेल, जाणून घ्या

 

Pune Crime | प्रॉपर्टीसाठी 32 वर्षाच्या सुनेकडून 75 वर्षांच्या सासर्‍याला बेदम मारहाण; चंदननगर परिसरातील घटना

 

Crime News | महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; नायब तहसीलदार ‘गोत्यात’, Facebook वर झाली होती मैत्री