Pune Crime | विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माहेरच्या लोकांकडून सासू-साऱ्यांना बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | विवाहितेला कायम त्रास देत असल्याने सासु-सासऱ्याला विवाहितेच्या घरच्यांकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) खेड तालुक्यात घडली आहे. या घटनेत दोन्ही बाजूने परस्परविरोधी खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) 10 जणांवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

 

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती निती भगवान टोके (रा. चास गुंजवठा) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, विवाहितीचे सासू अलका भगवान टोके,
सासरे भगवान धोंडीबा टोके यांनी फिर्यादीची पत्नी रेशमा नितीन टोके हिला सांगितले.
गुरांना चारा पाणी वैगरे दिले का असे विचारलेचा राग मनात धरुन माहेरी हा प्रकार (Pune Crime) सांगितला.

 

दरम्यान मारुती बोत्रे, युवराज बोत्रे, शंकर बोत्रे (रा. दावडी ता. खेड) श्रीराम कान्हूरकर (रा. पाबळरोड) दत्ता पवार (रा. म्हाळुंगे)
व इतर अज्ञात 10 ते 12 जणांनी फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीची आई अलका टोके व वडील भगवान टोके दोघांना लोखंडी रॉडने,
दांडक्यांनी, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन धमकी (Threat) दिली.

 

दुसरी फिर्याद रेशमा नितीन टोके (रा. गुंजवठा चास) यांनी दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, पती नितीन टोके, सासरे भगवान टोके, सासु अलका टोके, फिर्यादीची नणंद योजना कैलास पाटाडे,
नाजुका उदय घलप यांनी 2015 पासुन वेळोवेळी फिर्यादी सासरी नांदत असताना लग्नात योग्य मानपान आणि दागिने (Jewelry)
दिले नसल्याच्या कारणावरुन शाररिक व मानसिक छळ केला.

तसेच घरात असताना सासरे भगवान टोके यांनी हातात डिझेलची बाटली घेऊन घरात आले.
त्यापाठीमागे सासु अलका या घरात आल्या व त्यांनी फिर्यादीचे दोन्ही हात धरले व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सासरे टोके यांनी अंगावर डिझेल ओतले.
सासु अलका यांनी घरातील माचिस घेऊन साडी पेटविली ती साडी घरातील टपामधील पाण्यामध्ये बुडवुन विझवली असता त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली.
पुढील तपास खेड पोलीस (Khed Police Station) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | attempt burn married woman alive khed police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Government Employees | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये करण्यात आली 9 % वाढ, जाणून घ्या कोणाला होणार ‘फायदा’

Pune Crime | दुर्दैवी ! बांधकाम अंगावर पडून तरुण कंत्राटदाराचा मृत्यू, दौंडमधील घटना

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,293 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी