Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दसर्‍याला गावाकडे झालेल्या भांडणातून एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या होत्या. या भांडणाच्या रागातून चुलत भावाने साथीदारांच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याला जीवे मारण्याचा (Attempt To Kill) प्रयत्न केला. (Pune Crime)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) ओंकार अनिल कोळपे Omkar Anil Kolpe (वय २०, रा. जांभळी – Jambhali , ता. भोर Bhor) व त्याच्या साथीदारांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अजित शंकर कोळपे (वय २६, रा. जांभळी, ता. भोर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti Hospital) उपचार करण्यात येत आहेत. ही घटना कात्रज येथील गुजरवाडी फाट्याच्या (Gujarwadi Katraj) अलिकडे चौगुले शोरुमसमोर रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत शंकर तुळशीराम कोळपे (वय ५०, रा. जांभळी, ता. भोर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३३५/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांचा मुलगा अजित व त्याचा चुलत भाऊ ओंकार व चुलते अनिल कोळपे यांचे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या मुळगावी जांभळी येथे दसर्‍याचे भांडण झाले होते. राजगड पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. अजित याची येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) सुटका झाली. त्यानंतर तो गुजरवाडी फाटा येथील सिद्धटेक इंजिनिअरींग येथे कामाला जात होता. यावेळी त्याला जुन्या कारणावरुन जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व हातावर वार (Half Murder Case) करुन त्याला गंभीर जखमी केले. जखमीची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अजित कोळपे याला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक संगीता यादव (Police Inspector Sangeeta Yadhav) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर