Pune Crime | घरासमोर ‘खरकटे पाणी’ टाकल्याच्या वादातून कुर्‍हाडीने ‘वार’; किरकोळ कारणावरुन केला खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरासमोर खरकटे पाणी टाकल्याच्या किरकोळ वादातून एकाने शेजारी राहणार्‍यावर कुर्‍हाडीने वार (Pune Crime) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत राजेंद्र कुंडलिक धायगुडे (वय ४५, रा. गीतानगर, पणदरे, ता़ बारामती) हे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बारामती (Baramati) येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी कैलास हिरामण डोंबाळे आणि संगीता कैलास डोंबाळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पणदरे येथील गीतानगरमध्ये फिर्यादीच्या घरासमोर शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता डोंबाळे हिने राजेंद्र धायगुडे यांच्या घरासमोर खरकटे पाणी टाकले. त्याला धायगुडे यांनी विरोध केल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा कैलास डोंबाळे हा घरातून कुर्‍हाड घेऊन आला.

त्याने धायगुडे यांना याचे लय झाले आता यांना सोडत नाही असे म्हणून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कुर्‍हाडीने धायगुडे यांच्या मानेवर वार केला. त्यांनी तो चुकविण्याचा प्रयत्न केला. तरीही कुर्‍हाडीचा वार त्यांच्या खांद्यावर बसल्याने ते जबर जखमी झाले.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचू शकला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक लांडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 6.75 crore case! ransom case FIR against Sandeep Bhondwe, Vikas Bhondwe, Sachin Palande along with Mangaldas Bandal

Pimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस, पुढं झालं असं काही…

Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण

Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी ! थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर