Pune Crime | विमाननगर परिसरात खुनाचा प्रयत्न; विश्रांतवाडीमध्ये दहशत पसरवणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्रासोबत गप्पा मारत उभारलेल्या एकावर सराईत गुन्हेगारांच्या (Pune Criminals) टोळक्याने लोखंडी कोयत्याने वार करुन जखमी केल्याची घटना विमानतळ पोलीस स्टेशनच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत रविवारी (दि. 17) मध्यरात्री दोनच्या सुमारास (Pune Crime) घडली होती. तर याच टोळक्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतून जाताना आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. या दोन्ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी विवेक उर्फ मिठ्या प्रकाश गवळी (Vivek alias Mithya Prakash Gawli) आणि त्याचा अल्पवयीन (Minor) साथिदाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारने (Pune Police Crime Branch ) अटक (Arrest) केली आहे.

 

याप्रकरणी अनिल कालिदास विटकर Anil Kalidas Vitkar (रा. इंदिरा नगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय नगरे (Akshay Nagare), स्वप्निल भालेकर (Swapnil Bhalekar), फावड्या उर्फ कुणाल देशमुख (Kunal Deshmukh), आकाश सोनवणे (Akash Sonawane) व त्याच्या इतर दोन ते तीन साथिदारांवर आयपीसी 307, 324,504,506,143,147,148,148 महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) 37(1)(3) आर्म ॲक्ट (Arm Act) प्रमाणे खुनाच्या प्रयत्नासह (Attempted Murder) राईटचा गुन्हा दाखल केला होता. तर याच आरोपींनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली होती. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. (Pune Crime)

दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी माहिती मिळाली की, विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी सादलबाबा दर्ग्याजवळ (Sadalbaba Dargah) नदी पात्रात थांबले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विवेक गवळी याला अटक केली तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देऊन विमानतळ पोलिसांना आरोपींना वर्ग करुन ताब्यात घेण्यास सांगण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar), पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil),
पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, दिपक भुजबळ, प्रविण भालचीम, संजय आढारी, कौस्तुभ जाधव,
सागर वाघमारे, वैशाली माकडी, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder in Vimannagar area; pune police crime branch arrest pune criminals who spreading terror in Vishrantwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा