Pune Crime | कबुतराची विष्ठा, पंखाच्या त्रासाची तक्रार केल्याने मित्राच्या मदतीने तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

0
302
Pune Crime | Attempted murder of a young man with the help of a friend for complaining of pigeon excrement, feather trouble
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कबुतराची विष्ठा (Pigeon Faeces), पंखाचा त्रास होत असल्याची तक्रार दिल्याच्या रागातून मित्राच्या मदतीने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्यात आला. (Pune Crime)

 

याप्रकरणी रुपेश जनार्धन चव्हाण Rupesh Janardhan Chavan (वय ४३, रा. घोरपडी गाव) यांनी मुंढवा पोलिसांकडे (Mundhwa Police) फिर्याद (गु. रजि. नं. १८९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांच्या शेजारी चेतन जावळे (Chetan Jawle) हा राहतो. तो कबूतर पाळत असल्याने कबुतराची विष्ठा पंख याचा फिर्यादी यांना त्रास होत होता. त्या कबुतरांच्या त्रासाविषयी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी जावळे कुटुंबीयांना योग्य समज दिल्याने जावळे कुटुंबियांनी कबुतरे सोडून दिली होती. परंतु, त्याचा राग चेतन जावळे याच्या मनात होता. चव्हाण हे २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता मोटारसायकलवरुन घरी जात असताना घोरपडी गावातील न्यू स्वागत चिकन अ‍ॅन्ड फिश सेंटरसमोर चेतन जावळे याच्याबरोबर असलेल्या तिघांनी गाडी थांबवायला सांगितली.

त्यांनी गाडी थांबविल्यावर तुला दिसत नाही का असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली.
तिघांमधील एकाने कोयत्याने चव्हाण यांच्या डोक्यात, कानावर, उजव्या हाताच्या पंजावर, पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले.
त्यांच्यापासून जीव वाचविण्यासाठी चव्हाण पळत पळत घरी आले.
त्यानंतर त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक माने (Assistant Police Inspector Mane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder of a young man with the
help of a friend for complaining of pigeon excrement, feather trouble

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा