Pune Crime | दुर्दैवी ! कोथरुडमध्ये पुणे महापालिकेने बांधलेली सीमा भिंत कोसळून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या अंगावर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) बांधलेली सीमा भिंत (Boundary wall) पडल्याने (Collapses) गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. करण वली Karan Wali (वय – 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोथरुड येथील रामबाग कॉलनी (Rambaug Colony Kothrud) मधील जयभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर घडली आहे. जखमी करण याला नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल (Pune Crime) केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या जय हनुमान ट्रस्टचे नवनाथ खिलारे (Navnath Khilare) म्हणाले की, गप्पा मारत बसलेल्या करण वली यांच्या अंगावर भिंत कोसळली. या कामाची चौकशी (Inquiry) करावी. भिंतीचे काम दर्जाहीन असल्यामुळेच ही दुर्घटना घडली. वली हे या भागात वॉचमन (Watchman) म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. (Pune Crime)

 

या दुर्घटनेनंतर संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मजुराचे उपचाराचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जावा.
याभागातील भिंतीचा काही भाग यापूर्वीही ढासळला होता.
याठिकाणी होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत अनेकवेळा तक्रार करुनही कारवाई केली जात नाही. ही भिंत देखील चुकीची बांधल्याने पडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

 

 

Web Title :- Pune Crime | Bad luck A 26 year old youth died when a boundary wall built by Pune Municipal Corporation collapsed in Kothrud

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा