Pune Crime | बनावट कागदपत्राद्वारे बँकेची 98 लाखांची फसवणूक ! पुण्यातील वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका ठिकाणी मालमत्ता तारण ठेवली असतानाही त्याची बनावट कागदपत्रे (Fake Property Documents) तयार करुन बँकेकडून कर्ज (Bank Loan On Fake Property Documents) घेऊन ९८ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) करण्यात आली. ही कागदपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आणून न दिल्याने वकिलावरही गुन्हा (FIR On Pune Based Advocate) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

इंडियन ओव्हरसीज बँकेचे (Indian Overseas Bank) मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक गोपाल सर्वेसन एस (वय ५१, रा. वानवडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओमकार ब्रिजमोहन राठी Omkar Brijmohan Rathi (वय ४२, रा. हडपसर – Hadapsar) आणि अ‍ॅड. डी. डी. कुलकर्णी Adv. D.D. Kulkarni (रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

हा प्रकार १६ सप्टेंबर २०१४ पासून सुरु आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार राठी याने बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी खोटे कागदपत्र जमा केली. अ‍ॅड. डी. डी. कुलकर्णी हे बँकेचे वकिल आहे. बँकेने त्यांच्याकडे ही कागदपत्रे तपासणीसाठी दिली होती. त्यांनी मालमत्तेवर असलेले तारण बँकेच्या निदर्शनास आणून दिले नाही. राठी यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडे तारण ठेवण्यापूर्वी जनहित नागरी सहकारी पतसंस्था येथे तारण ठेवली होती. तीच मालमत्ता इंडियन ओव्हरसीज बँकेत तारण ठेवली. बँकेकडून ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज रक्कम व त्यावरील आजपर्यंत त्यावरील व्याज ३८ लाख ५८ हजार ९०० रुपये असे एकूण ९८ लाख ५८ हजार ९०० रुपयांची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Bank fraud of Rs 98 lakh through forged documents A case has been registered against both of them including a lawyer from Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा