Pune Crime | सावधान ! अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास खावी लागेल जेलची हवा; पुण्यात अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ Facebook वर पोस्ट करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हिडिओ (Pornographic videos) बनविणे, पाहणे, ते सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे अल्पवयीन मुलांचे व्हिडिओ फेसबुकवर (Facebook) पोस्ट करणार्‍यास वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) अटक (Pune Crime) केली आहे.

सिद्धु गोलालाप्पा चांदकोटी Sidhu Golalappa Chandkoti (वय ३३, रा. रामटेकडी – Ramtekadi) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीखक भूषण पोटवडे (PSI Bhushan Potwade) यांनी फिर्याद दिली आहे.

एनसीएमईसी या अमेरिकन सामाजिक संस्थेच्या (NGO) तक्रारीवरुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चाइल्ड पोर्नोग्राफीवर (child pornography) कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार एनसीआरबी (NCRB) देशभरात चाइल्ड पोर्नोग्राफीवर नजर ठेवते.
सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांचे व्हिडिओ व्हायरल करणार्‍यांची माहिती स्थानिक पोलिसांना दिली जाते.
त्यानुसार वानवडी पोलिसांना याची माहिती मिळाली होती.
सिद्धु चांदकोटी याने १७ जून २०२० रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या फेसबुक अकाऊंटवर
लहान मुलांचा अश्लिल व्हिडिओ पोस्ट केला होता,
म्हणून गुन्हा दाखल (Pune Crime) करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) साळगावकर (Police Inspector Salgaonkar) करत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Be careful If you post pornographic videos on social media you will have to go to jail Man arrested for posting videos of minors on Facebook in Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

 

Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड

 

Coronavirus Cases Today in India | देशात अनियंत्रित झाला कोरोनाचा वेग, आज 1 लाख 17 हजार नवीन केस, ओमिक्रॉनचा आकडा 3000 च्या पुढे