Pune Crime | ब्युटी पार्लरच्या कामासाठी होम सर्व्हिससाठी गेल्याने पत्नीला मारहाण करुन जमिनीवर आपटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ब्युटी पार्लरच्या (Beauty Parlour) कामासाठी अनेकदा महिला घरी बोलावतात. महिलेला होम सर्व्हिससाठी जाणे महागात पडले. पतीने संशय घेऊन तिला लाटण्याने मारहाण करुन केस धरुन जमिनीवर आदळून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सुतारदरा (Sutardara Kothrud) येथील एका ३५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील एका पोळी भाजी केंद्रात घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पोळी भाजी केंद्रात काम करतात.
तसेच त्या पार्लरचे काम करतात. पार्लरच्या कामासाठी होम सर्व्हिससाठी (Beauty Parlour Home Service) त्या एका ग्राहकाकडे गेल्या होत्या.
या कारणावरुन त्यांच्या पतीने संशय घेतला. त्या पोळी भाजी केंद्रात असताना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोळी भाजी केंद्रातील किचनमधील लाटण्याने मारहाण करुन जखमी केले. डोक्याचे केस धरुन जमिनीवर आदळले. यात जखमी झाल्यामुळे आता त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Beauty Parlour Home Service Husband Wife Beting Case Kothrud Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | पाकिस्तानच्या PM ने केलेल्या ट्विटवर इरफानचे सडेतोड उत्तर, म्हणाला ” तुमच्यात आणि आमच्यात….”

Uddhav Thackeray | नाशकात ठाकरे गटात घरवापसी सत्र सुरु

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना…’