Pune Crime | लोणावळा परिसरात क्रिकेट सामन्यावर सट्टा, चार जण गजाआड; 2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) क्रिकेट सामन्यावर (Cricket Match) सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने Local Crime Branch (LCB) अटक केली आहे. ही कारवाई लोणावळा (Lonavala) परिसरातील आपटे गावात करण्यात आली. अटक (Arrest) करण्यात आलेले सट्टेबाज गुजरातमधील (Gujarat) रहिवासी आहेत. या कारवाईमध्ये 53 हजार रुपये रोख, सहा मोबाईल, लॅपटॉप, टॅब असा एकूण 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल (Pune Crime) जप्त केला आहे.
या प्रकरणी अजय नटवरलाल मिठीया Ajay Natwarlal Mithiya (वय 47), रवी रसिकभाई रजाणी Ravi Rasikbhai Rajani (वय 26), निपूल देवासीभाई पटेल Nipool Devasibhai Patel (वय 28), जिग्नेश गणेशभाई रामाणी Jignesh Ganeshbhai Ramani (वय 32), मितेश रमेशभाई सिंधू Mitesh Rameshbhai Sindhu (वय 27, रा. सर्व रा. राजकोट, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)
भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर आपटे गावातील लेक मॅन्शन बंगल्यात (Lake Mansion Bungalow)
ऑनलाइन सट्टा (Online Betting) घेतला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी लोणावळा परिसरातील आपटे गावातील बंगल्यावर छापा टाकून सट्टेबाजांना ताब्यात घेतले.
आरोपींविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात (Lonavala Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte), उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले (Sub Divisional Officer Bhausaheb Dhole),
पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke), सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare),
शब्बीर पठाण, तुषार पंधारे, विक्रम तापकीर, चंद्रकांत जाधव आदींनी ही कारवाई केली.
Web Title :- Pune Crime | Betting on cricket match in Lonavala area, four people arrested; 2.88 lakh worth of goods seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार