Pune Crime | दुकानातून भाड्याने कॅमेरे घेऊन त्याची विक्री करणारा भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॅमेरा भाड्याने (Rent Cameras) देणाऱ्या दुकानदारांचा विश्वास संपादन करुन कॅमेरा भाड्याने घेऊन त्याची विक्री करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidhyapeeth Police) अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन कॅनॉन 200 डी (Canon 200D) कॅमेरे जप्त केले आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) नऱ्हे येथे करण्यात आली.

 

लक्ष्मण नामदेव सांगळे Laxman Namdev Sangale (वय-19 रा. सध्या नऱ्हेगाव, भुमकर पेट्रोल पंपासमोर, सिंहगड रोड -Sinhagad Road, मुळ रा. शिव पार्वती नगर, ठाकरे चौक, पंढरपुर जि. सोलापूर ­-Solapur) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गगन विजयकुमार जाधव Gagan Vijaykumar Jadhav (वय-19 रा. दिव्यस्पुर्ती सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कॅमेरे भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. आरोपीने 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन कॅनॉन 200 डी कॅमेरे भाड्याने घेतले. मात्र ते परत न करता त्याचा अपहार केला. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे (Hershal Shinde), धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) व सचिन गाडे (Sachin Gade) यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरातील (Pune Crime) विविध ठिकाणाहून कॅमेरे भाड्याने घेत असतो. तसेच तो नऱ्हे येथे राहात असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन कॅमेरा भाड्याने घेऊन त्याची विक्री करत असल्याचे कबुल केले. आरोपीकडून गुन्ह्यातील दोन कॅमेरे जप्त केले आहेत. तसेच अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav), पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde), पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार,
हर्षल शिंदे, आकाश फासगे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Bharti vidyapeeth police arrest Laxman Namdev Sangale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील ‘वानवडी जनरल हॉस्पिटल’चे लोकार्पण

 

Pimpri Corona Update| पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक