समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘खुलेआम’ मोबाईलवर लॉटरीचा जुगार, गुन्हे शाखेचा छापा, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील लॉटर्‍यांचे दुकाने बंद केल्यानंतर आता मोबाईलवर लॉटरीचा जुगार सुरू झाला असून, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने अशा एका जुगारावर कारवाई करत दोघांना पकडले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेमंत आनंद दिघे (वय 42, रा. संगमवाडी) आणि आकाश सुनिल तारू (वय 23, रा. कसबापेठ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश अवैध धंद्यांना यामुळे ब्रेक लागला असून, सर्वांचेच दुकाने बंद पडली आहेत. त्यामुळे पोलीस दल अन अवैध धंदे वाल्यांमध्ये खदखद आहे. दरम्यान, काही ठिकाणी मात्र, छुप्या अन उघड पद्धतीने धंदे सुरू आहेत. त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईलवर लुटरीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथखाने याठिकाणी छापा टाकून दोघांना पकडले.
त्यावेळी हेमंत दिघे हा मोबाईल लॉटरी जुगार घेत होता. तर, आकाश तारू हा खेळण्यासाठी आला होता. दोघांवर गुन्हा दाखलकरून अटक केली गेली आहे. मात्र, मोबाईल लॉटरीचा जुगारामुळे पोलीसही आवाक झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/