Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीसह राजकीय पक्षाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मोक्काच्या (MCOCA Action) गुन्ह्यातील फरार माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI Activist Pune) रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barhate) याच्या पत्नी (Wife) आणि वंचीत बहुजन आघडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) हडपसर विधानसभा अध्यक्षाला (Hadapsar Assembly Speaker) पुण्याच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) अटक (Arrest) केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barhate) फरार आहे. पुणे पोलिस (Pune Police) त्याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. दरम्यान, बर्‍हाटे याची पत्नी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Pune Crime Branch Police) मिळाली होती. त्याबाबत सखोल चौकशी आणि इतर तपासासाठी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) बर्‍हाटेच्या पत्नीला अटक केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

संगीता रवींद्र बर्‍हाटे (Sangeeta Ravindra Barhate) आणि पिंताबर गुलाब धिवार (Pintabar Rose Dhiwar) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI Activist Pune) रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barhate), बडतर्फ पोलिस शैलेश जगताप (dismissed Police Shailesh Jagtap), पत्रकार देवेंद्र जैन (Journalist Devendra Jain), सांगलीचे संजय भोकरे (Sanjay Bhokare Sangli), यांच्यासह इतर काही आरोपींवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Chatushrungi Police Station) गुन्हा (FIR) दाखल आहे. रवींद्र बर्‍हाटे, शैलेश जगताप आणि इतर काही जणांवर पुणे शहरातील (Pune City) विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. फसवणूक (Cheating), खंडणी (Ransom) आणि इतर कलमान्वये हे गुन्हे (FIR) दाखल झालेल्या आहेत. पोलिसांनी रवींद्र बर्‍हाटे टोळीवर (Ravindra Barhate gang), मोक्काअंतर्गत कारवाई (MCOCA Action) देखील कली आहे. बर्‍हाटे गेल्या काही महिन्यांपासून फरार आहे. त्याच्या पुणे गुन्हे शाखेचे पोलिस (Pune Crime Branch Police) शोध घेत आहेत.

दरम्यान, आज (बुधवार) पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी (Pune Crime Branch Police) बर्‍हाटे याच्या पत्नी संगीता बर्‍हाटे (Sangeeta Ravindra Barhate) हिला अटक केली आहे.
याबाबत पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ((Pune Crime Branch Police) माहिती दिली आहे.
संगीता बर्‍हाटे हिला अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
पोलिस सखोल तपास करीत आहेत. दरम्यान रवींद्र बऱ्हाटे (Ravindra Barhate) याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर (Video sharing) केला होता.
तो बनविण्यासाठी मदत केली असल्याने पिंताबर धिवार (Pintabar Dhiwar) याला अटक केली आहे.
पिंताबर धिवार हे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) हडपसर विधानसभाचे अध्यक्ष (Hadapsar Assembly Speaker) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, बर्‍हाटेच्या पत्नीला पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) कार्यालयात आणले.
तेथे त्यांची अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivasa Ghadge),
तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख (Investigating Officer Assistant Commissioner of Police Surendra Kumar Deshmukh) यांनी चौकशी (Inquiry) केली.
त्यानंतर सायंकाळी त्यांना हडपसर (Hadapsar) येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
बर्‍हाटेच्या पत्नीला पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
त्यांना उद्या (गुरुवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Titel : Pune Crime Branch Police Hadapsar assembly speaker of one political party arrested along with sangita barate wife of RTI activist Ravindra Barate

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ