Pune Crime Branch Police | पत्नीला भेटायला पुण्यात आला अन् गुन्हे शाखेच्या जाळ्यात आडकला, सराईत वाहन चोराकडून 18 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद येथून पुण्यात पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या सराईत दुचाकी चोराच्या (motorcycle thieves) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट पाचने (Pune Crime Branch Police) मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 7 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 18 दुचाकी जप्त केल्या आहेत. शंकर भरत देवकुळे (वय-28 रा. खामसवाडी, खेसेगाव, ता. तुळजापूर, मुळ. रा. वैराग नाका, उस्मानाबाद) असे गुन्हे शाखा युनिट पाचने (Pune Crime Branch Police) अटक (arrest) केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 1 सप्टेंबर रोजी हडपसर (Hadapsar) आणि मुंढवा (Mundhava) परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी घोरपडी परिसरात एक सराईत वाहन चोर पत्नीला भेटण्यासाठी आल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल भिलारे (Vishal Bhilare) आणि प्रमोद टिळेकर (Pramod Tillekar) यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

Pune News | पुण्यात 1 किडनी असलेल्या 3 वर्षाच्या कुत्र्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, देशातील पहिलीच घटना

आरोपी शंकर देवकुळे याला समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) गुन्ह्यात अटक करुन
सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याच्याकडून 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या
दुचाकीपैकी पुणे शहरात 11, पिंपरी चिंचवड शहरात 3 आणि ग्रामीण मधून 1 अशा एकूण 16 दुचाकी
चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 14 वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) भाग्यश्री नवटके (Additional Commissioner of Police Bhagyashree Navatke), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे (PSI Somnath Shendge), पोलीस अमंलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर दया शेगर, विशाल भिलारे, विलास खंदारे, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, दाऊद सय्याद, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, अश्रृबा मोराळे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | पुण्यातील ज्येष्ठ महिलेला सीमकार्ड अपडेट करणे पडले 11 लाखांना, 4 परप्रांतियांवर FIR

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime Branch Police | pune crime branch police arrest motorcycle thieves and recover 18 motorcycle 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update