Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | घराबाहेर पडताना दागिने घालून गेले तर मोटारसायकलवरुन येऊन गळ्यातील दागिने कधी खेचून नेतील, याचा काही नेम राहिला नाही. दागिने घरात ठेवले आणि काही वेळाबाहेर बाहेर गेले तर चोरटे घरफोडी (burglary) करुन कधी घर धुवून नेतील, याचा काही नेम राहिलेला दिसून (Pune Crime) येत नाही. याचा प्रत्यय हडपसरमधील (Hadapsar) एका महिलेला आला आहे.

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे.
या महिला गोसावी वस्तीत राहतात. त्या मॉर्निंग वॉकसाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडल्या.
सुमारे ४० मिनिटांनी त्यात परत घरी आल्या.
तोपर्यंतच्या काळात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १४ हजार ५०० रुपयांचे ८ ग्रॅम ९८० मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
शुक्रवारी दिवसभरात शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

शिवणे (Shivne) येथील महिला कुटुंबासह मुळशी (Mulshi) येथे गेल्या असताना चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून ४८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले.
ऊरुळी देवाची (uruli devachi) येथील बंगल्याच्या किचनची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांनी
आत प्रवेश केला व १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचे ४६ ग्रॅम वजनांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.

 

Web Title : pune crime | burglary in hadapsar area of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा