Pune Crime | आर्थिक व्यवहारातील पैसे न दिल्याने व्यावसायिकाची आत्महत्या; येरवडा पोलिसांकडून हेमंत भंडारी आणि मोनीश ऊर्फ टिनु भंडारीला अटक, हर्षल बालदोटा आणि किरण पवारसह 5 जणांविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमीन व्यवहारात (Land Transactions) जमीन मालकास विसारापोटी दिलेली रक्कम तसेच हात उसने दिलेले असे ६१ लाख ५० हजार रुपये परत न केल्याने आर्थिक कोंडी झाल्याने एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

हेमंत मोहनलाल भंडारी Hemant Mohanlal Bhandari (वय ६०) आणि मोनीश ऊर्फ टिनु हेमंत भंडारी Monish alias Tinu Hemant Bhandari (वय २२, रा. ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच आरती मोनीश भंडारी Aarti Monish Bhandari (वय २८), हर्षल ऊर्फ टिंकु मदनलाल बलदोटा Harshal alias Tinku Madanlal Baldota (वय ४५, रा. अदिनाथ सोसायटी), किरण महादु पवार Kiran Mahadu Pawar (वय २७, रा. सातारका वस्ती, ता. खेड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

अजयकुमार विरदीचंद बेदमुथा Ajay Kumar Virdichand Bedmutha (रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी प्रतिमा अजयकुमार बेदमुथा Pratima by Ajay Kumar Bedmutha (वय ४०, रा. शास्त्रीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०८/२२) दिली आहे. हा प्रकार २०१८ ते २४ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार बेदमुथा हे शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणुक (Investment) करीत असत. त्यांनी भंडारी व इतरांना हातउसने रक्कम दिली होती. जमीन व्यवहारात जमीन मालकास विसारापोटी दिलेली रोख रक्कम बेदमुथा यांच्या परस्पर संबंधित व्यक्तीकडून घेऊन आरोपींनी ती स्वत:जवळ ठेवली.
असे सर्व मिळून ६१ लाख ५० हजार रुपये बेदमुथा यांनी वारंवार मागितली. ती त्यांनी अद्याप परत केली नाही.
तसेच बेदमुथा यांच्या नावावर असलेली स्वीफ्ट कार (Swift Car) ही हेमंत भंडारी व मोनीश भंडारी यांनी महत्वाचे
कामासाठी दोन तीन दिवसांसाठी घेतली. ती परत केली नाही. यामुळे बेदमुथा यांची आर्थिक कोंडी झाली होती.
त्यातूनच त्यांनी १४ जुलै २०२२ रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आरोपींनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून
सहायक पोलीस निरीक्षक आळेकर (Assistant Police Inspector Alekar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Businessman’s suicide due to non-payment of financial
transactions; Yerawada police arrested Hemant Bhandari and Monish alias Tinu Bhandari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा