Shivsena | उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची ‘ती’ मागणी मान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्तासंघर्ष झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटामधील (Shinde Group) वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेला. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे (Constitutional Bench) सोपवण्यात आले. तसेच जोपर्यंत सुनावणी सुरु होत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका असे निर्देश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) दिले आहेत. सुप्रीम कोर्टातील या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ द्यावा अशी मागणी केली होती. आता निवडणूक आयोगाने शिवसेनेने (Shivsena) केलेली मागणी मान्य करत उद्धव ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.

 

शिवसेना कोणाची हा वाद सध्या केंद्रीय निवडणुक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना 23 ऑगस्टपर्यंत सगळी कागदपत्रे (Documents) सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाने (Thackeray Group) निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र आयोगाने दोन आठवड्यात म्हणजे 23 ऑगस्टला कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आपणास कागदपत्रे सादर करण्यास 4 आठवडे मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेनं (Shivsena) केली होती.
सर्वोच्च न्यायालयात सध्या हे प्रकरण असून तोपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, असे शिवसेनेने आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते.
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पत्राची दखल घेत त्यांची विनंती मान्य केली आहे.
शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :- Shivsena | uddhav thackeray a big relief to uddhav thackeray the
election commission accepted the demand of shivsena dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा