Pune Crime | तळेगाव-चाकण रोडवरील इंद्रायणी नदीत कार कोसळून संजय बोरसे यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तळेगाव-चाकण रोडवरील (Talegaon-Chakan Road) इंदोरी (Indori) गावाच्या हद्दीमधील इंद्रायणी नदीत (Indrayani River) कार कोसळून (Car Crash) एकाचा मृत्यू (Death) झाला (Pune Accident News). इंदोरी येथील ब्रिटीशकालीन पुलावरुन ही कार इंद्रायणी नदी पात्रात कोसळली. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (Talegaon MIDC Police Station) अधिकाऱ्यांनी (Pune Crime) व्यक्त केला आहे.

संजय पुनमचंद बोरसे Sanjay Punamchand Borse (वय-43 रा. मनोहरनगर, तळेगाव स्टेशन-Talegaon Station) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय बोरसे हे चाकण येथील एका कंपनीत कामाला होते. चाकण बाजूकडून तळेगावच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीपात्रात कोसळली.(Pune Crime)

इंदोरी (Indori) येथील इंद्रायणी नदीपात्रात एक कार कोसळली असून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी पोलिसांना मिळाली. स्थानिक ग्रामस्त, पोलीस प्रशासन आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, अविनाश कार्ले, वैभव वाघ, मयूर दाभाडे, अनिश गराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार आणि मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | car crash in indrayani river on talegaon to chakan road one person death pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त