Pune Crime | पुण्यात कंत्राटाच्या वादातून ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्याला भोसकले, 2 जणांवर FIR

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इंटरनेटचे कंत्राट (Internet contract) मिळवण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चाकूने भोसकल्याची (knife attack) घटना पुण्यातील (Pune Crime) वाकड परिसरात घडली आहे. ही घटना सोमवार (दि.18) रोजी दुपारी दीडच्या सुमारास इको ग्रीन सोसायटी (Eco Green Society) जवळ घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी देखील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे (Corporator) समर्थक असल्याचे समजतेय.

 

याप्रकरणी सुमित मधुकर भूमकर Sumit Madhukar Bhoomkar (रा. भूमकरवस्ती, वाकड), प्रतिक लोखंडे Pratik Lokhande (रा. नवी सांगवी) यांच्यासह अन्य एकावर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मागील काही दिवसांपासून फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये इंटरनेटचे कंत्राट मिळवण्यावरून वाद (dispute) सुरु होते. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला जातिवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली होती.

 

त्यानंतर सोमवारी (दि.18) दुपारी दीडच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्यावर हल्ला चढवला.
आरोपी सुमित याने फिर्यादी यांना चाकूने भोसकले तर इतर आरोपींनी सिमेंटच्या ब्लॉकने व हातोड्याने मारहाण केली,
असे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये (Pune Crime ) उपचार सुरु आहेत.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- pune crime | contract dispute in pimpri knife attack on ncp leader in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission | खुशखबर ! मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; DA 3% नी वाढवला

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एकाला गुन्हे शाखेकडून अटक

Indrani Balan Foundation | पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे 23 ऑक्टोबर पासून आयोजन