Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा, 1 वर्षात मिळाला न्याय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील वेल्हे पोलीस ठाण्याच्या (Velha Police Station) हद्दीमध्ये एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण (Kidnap) करुन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करुन खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना 15 फेब्रुवारी 2021 रोजी घडली होती. या गुन्ह्यातील नराधमाला पुणे ग्रमीण पोलिसांनी (Pune Rural Police) अवघ्या 48 तासात बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र (Chargesheet) सादर केले. आरोपी संजय बबन काटकर Sanjay Baban Katkar (वय-38 रा. कादवे, पानशेत, ता. वेल्हे, जि. पुणे) याला विशेष न्यायाधीश पॉक्सो अॅक्ट संजय ए देशमुख (Special Judge Pocso Act Sanjay A. Deshmukh) यांनी सोमवारी (दि. 28 फेब्रुवारी) मरेपर्यंत फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली. (Pune Crime)

 

अधिक माहिती अशी की, 15 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, हवेली तालुक्यालीत (Haveli Taluka) मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील एका पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना सापडला. वैद्यकीय अहवालातून (Medical Report) चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली.

 

 

 

गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेल्हे पोलीस ठाण्यातील प्रभारी व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, रिक्षाचालक, दुकानदार व इतर साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संजय काटकर याचा शोध सुरु केला. आरोपी ज्या ठिकाणी लपला होता त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसलेल्या अतिशय दुर्गम भागात पोलीसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन गुन्हा घडल्यानंतर 48 तासात बेड्या ठोकल्या. (Pune Crime)

 

पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करताना परिस्थितीजन्य पुरावा (Situational Evidence), डीएनए टेस्टींग (DNA Testing), मेडिकल ग्राउंड (Medical Ground) व इतर पुरावे गोळा करुन न्यायालयात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र मुदतीत सादर केले. या गुन्हाचा खटला जलतगती न्यायालयात (Fast-Track Court) व्हावा अशी विनंती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय ए. देशमुख यांच्या जलतगती न्यायालयात याची सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

 

 

या प्रकरणात सकारच्या वतीने विलास पठारे (Vilas Pathare) यांनी काम पाहिले. तर कोर्ट कारकुन म्हणून पोलीस नाईक प्रसाद मांडके (Police Naik Prasad Mandke), व सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचित (Vidyadhar Nichit) यांनी काम पाहिले. तर ट्रायल मॉनिटर सेल केस अधीकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार (API Manoj Pawar) यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा जलत गतीने तपास करुन आरोपीला एक वर्षाच्या आत शिक्षा झाल्याने पोलीस अधीक्षकांनी पथकाला 35 हजार रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) ,
तत्काली अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील (Addl SP Vivek Patil),
तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील (SDPO Sai Bhore Patil),
तत्कालीन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सहायक फौजदार एस.एस. बांदल, आर.एस. गायकवाड,
पोलीस हवालदार ए.एन. आडवाल, पोलीस नाईक ए.पी. शिंदे, ए.आर साळुंखे, एस.आर. ओमारे, व्हि.एस. मोरे, डी.ए. जाधव यांच्या पथकाने तपास केला.

 

Web Title :- Pune Crime | Court pronounces death verdict for accused in child’s rape and murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा