Pune Crime | मौज-मजा करण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणारा दत्तवाडी पोलिसांच्या जाळ्यात, 4 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मौज-मजा करण्यासाठी पुणे शहरातुन महागड्या दुचाकी चोरणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन लाखांच्या 4 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हि कारवाई (Pune Crime) जनता वसाहत येथे केली. आरोपीने दोन अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने वाहन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

रोहित विष्णु क्षीरसागर (वय-22 रा. जनता वसाहत, पुणे, मुळ रा. किल्लारी, ता. औसा, जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे पाटील यांना माहिती समजली की, जनता वसाहत बागेजवळून पल्सर 220 सीसी गाडी चोरणारा हा जयभवानी नगर येथील गणपती मंदिराजवळ आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने वाहन चोरीचे गुन्हे त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपीने दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने मौज-मजा करण्यासाठी बजाज कंपनीच्या 220 सीसीच्या पल्सर दुचाकी चोरल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 सोहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे,
पोलीस अंमलदार प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे पाटील, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे,
अनिस तांबोळी, किशोर वळे, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल दबडे, अमित चिव्हे, प्रशांत शिंदे,
सद्दाम शेख आमि नवनाथ भोसले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Dattawadi police caught stealing expensive bikes for fun, 4 bikes seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत