Pune Crime | पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्याच्या नावाने RTI कार्यकर्त्याकडे खंडणीची मागणी, 2 तथाकथीत पत्रकार ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (Pune Crime ) पोलीस आयुक्तालयातील (Police Commissionerate) एका बड्या अधिकाऱ्याच्या नावावर एका माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे (RTI Activist) खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन तथाकथित पत्रकारांना (journalist) ताब्यात घेतले आहे. आरोपींनी आरटीआय कार्यकर्त्याकडे दोन लाखांची मागणी करुन 75 हजार रुपये घेतले. तसेच उर्वरित पैशांसाठी धमकी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन तथाकथित पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधीर रामचंद्र आलाट (Sudhir Ramchandra Alat) (वय-51 रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजी नगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. आलाट यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राहुल कांबळे (Rahul Kamble) आणि जहिर मेमन (Zaheer Memon) या दोन तथाकथित पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलाट हे भाजप (BJP), शिवाजीनगर मतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. ते भ्रष्टाचार (corruption) विरोधी आंदोलनात सक्रीय असतात.

त्यांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी, पुढारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी गृहमंत्रालय, पंतप्रधान (PM), सीबीआय (CBI), ईडी (ED), मुख्यमंत्री (CM), पोलीस महासंचालक, एसीबी (anti corruption bureau), पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner), पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी करीत आहेत.

आलाट यांना माहिती मिळताच त्यांनी कांबळे याला फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यावेळी कांबळे याने मला तुमची अडचण समजली असून कधी भेटायचे असे विचारले.

कांबळे याने आलाट यांना आपण लवकरच भेटू तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र चालू आहे.
यानंतर आलाट यांनी कांबळे आणि मेमन यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली.

त्यावेळी त्या दोघांनी तुमच्या पाठिमागे पाच ते सहा अधिकारी लागले असून त्यांनी आमच्याकडे तुमच्या विरोधात तक्रार केली आहे.

तसेच आमच्या तक्रारीवरुन तुमच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्तालयातील एका बड्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला असून तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात सेफ राहायचे असेल तर तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये द्या अन्यथा पोलीस अधिकारी तुम्हाला अटक करतील, अशी धमकी दिली.

यावेळी कांबळे याने आलाट यांच्या समोर पोलिस अधिकारी,
वकील आणि इतरांना फोन करुन सुधीर आलाट यांच्या विरोधात आम्ही केलेल्या तक्रारी मागे घेत असल्याचे सांगितले. यानंतर आलाट यांनी दोघांना 75 हजार रुपये दिले.

परंतु उरलेले 1 लाख 25 हजार रुपयांसाठी कांबळे आणि मेमन यांनी सतत आलाट यांना फोन करुन धमकी देत होते.

सततच्या धमक्यांना वैतागून आलाट यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी कांबळे आणि मेमन या दोन तथाकथित पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime | demand for ransom from rti activist in the name of a senior
police officer in the commissionerate of police pune

हे देखील वाचा

Pune Corporation | विकास आराखड्याच्या भूमिकेवर महापौर मोहोळ ठाम ! समाविष्ट गावांचा विकास आराखडा महापालिकेकडेच द्या, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Homeguards | राज्यातील 42 हजार होमगार्डचं मानधन थकलं, सरकारकडून मानधन न मिळाल्यानं आर्थिक संकट

Gold-Silver Price Today | आज उच्चांकी स्तरावरून 7,817 रुपये ‘स्वस्त’ मिळतंय सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव