Pune Crime | गोयल गंगा बिल्डरला 10 लाखांच्या खंडणीची मागणी; उत्सवासाठी वर्गणी घेऊन वैयक्तिक कामासाठी वापर करणाऱ्या जागा मालकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महंमदवाडी येथील जागा विकत घेतल्यानंतर उत्सव, मंदिर बांधकाम (Temple Construction) अशा कारणासाठी वर्गणी घेऊन तिचा वापर वैयक्तिक कामासाठी केला. त्याची विचारणा केल्यानंतर १० लाख रुपयांची खंडणी (Ransom) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोयल (Goyal Ganga Builder) यांना मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजय गुलाब घुले (Sanjay Gulab Ghule) याच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी गोयल गंगा बिल्डरच्या वतीने अनुज उमेश गोयल Anuj Umesh Goyal (वय ३९, रा. सन माहु बिल्डिंग, बंडगार्डन रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी (Pune Police) संजय गुलाब घुले (रा. महंमदवाडी), पुष्पा मंदीरे (Pushpa Mandire), रजिया शेख (Razia Sheikh), अनिता साळवी (Anita Salvi), चेतन भोंडवे (Chetan Bhondwe), उषा कामधेनु (Usha Kamadhenu) व इतर ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी ते ६ एप्रिल २०२२ दरम्यान महंमदवाडी (Mahammadwadi) येथे घडली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज गोयल हे बांधकाम व्यावसायिक (Builders In Pune) आहेत. संजय घुले याने त्याच्या मालकीची महंमदवाडी येथील जमीन फिर्यादी यांच्या श्री बालाजी रियालटी (Shree Balaji Realty) या बांधकाम संस्थेस विकली आहे. त्या जागेवर सध्या बांधकाम सुरु आहे. जमिनीचा पूर्ण मोबदला त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळाला आहे. असे असताना संजय घुले हा उत्सव, मंदिर बांधकाम अशा वेगवेगळ्या कारणाने दर ६ महिन्यांनी वर्गणी स्वरुपात पैसे घेऊन ते सामाजिक कामात न वापरता वैयक्तिक कामात वापरले. फिर्यादी यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी स्वरुपात मागणी केली. फिर्यादी यांनी ती न दिल्याने आरोपींनी गोयल यांच्या बांधकाम साईटवर जाऊन तेथील सुरक्षा रक्षक व बांधकाम विकसक यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | Demands Rs 10 lakh ransom from Ganga builder ;
Filed a case against 15 persons including the owner of the place who used it for personal
work by taking subscription for the festival

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून