Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बुधवार पेठेतून दुचाकी चोरणाऱ्या (Bike Thieves) सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी (Pune Police) अटक केली. त्याच्याकडून साडेचार लाखांच्या तब्बल 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्याच्या मुसक्या (Arrest) आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सोहेल युनूस शेख Sohail Yunus Shaikh (वय-26 रा. देहुरोड, ता-मावळ) असे अटक केलेल्याचे (Pune Crime) नाव आहे.

 

फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीतून दुचाकी चोरींचे प्रमाण वाढल्यामुळे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंगसह सीसीटीव्हींचे फुटेज पडताळणी करीत होते. बुधवार पेठेतून रात्रीच्या वेळी दुचाकी चोरली जात असल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Senior Police Inspector Shabbir Syed) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे (Santosh Shinde), वैभव स्वामी,  प्रविण पासलकर,  सुमित खुट्टे  पेट्रोलिंग करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणारा चोरटा पोलिस नाईक वैभव स्वामी यांना आढळून आला. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता, त्याने  फरासखाना परिसरातून 16 दुचाकी आणि वाकड मधून एक अशा 17 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. (Pune Crime)

सराईताने वाहनचोरीचे केलेले 17 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. वाहनचोरी उघडकीस आणण्यासाठी फरासखाना पोलिसांनी परिसरातील 150 ते 200 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. दिवसरात्र पेट्रोलिंग करून सराईत वाहनचोर सोहेलला अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ . प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Narnaware),
सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे (API Santosh Shinde),
उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi),  रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर,
वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर वल्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, किशारे शिंदे,
गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Faraskhana Police arrests innkeeper who stole two-wheelers, 16 bikes seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

Pune Crime  | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR