Pune Crime | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचे खरे कारण आले समोर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स (Chandrarang Developers) या कार्यालयावर मंगळवारी (दि.23) दुपारी पेट्रोल बॉम्बने हल्ला (Petrol bomb attack) केला होता. या गुन्ह्याचा तपास करुन सांगवी पोलिसांनी (Sangvi police) तिघांना अटक करुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात (Pune Crime) धक्कादायक खुलासा झाला आहे. केवळ वाढदिवसाचा केक (Birthday cake) कापला नाही म्हणून तरुणांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

तन्मय रामचंद्र मदने (वय-19 रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, सुदर्शननगर, पिंपळे गुरुव), विक्रम विजय जवळकर (वय-20 रा. हरिओम बिल्डींग, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (वय-23 रा. साई मिलन बिल्डींग, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

 

गोठ्यात रचला कट
आरोपींनी तोंडाला मास्क, गाडीच्या नंबर प्लेटवर चिकटपट्टी लावली होती. त्यामुळे आरोपींना ओळखता येत नव्हते. पोलिसांनी गाडीच्या रंगावरुन आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या. विक्रम जवळकर (Vikram Jawalkar) याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आरोपींना दिली होती. विक्रम याच्या घराच्या गोठ्यात या गुन्ह्याचा कट रचण्यात आला होता. (Pune Crime)

 

केक न कापल्याच्या रागातून केला गुन्हा
आरोपी प्रद्युम्न भोसले (Pradyumna Bhosle) याचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त ‘मास्टरमाईंड’ असे लिहिलेला केक घेऊन तन्मय मदने (Tanmay Madane) व प्रद्युम्न भोसले हे त्यांच्या मित्रासोबत चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयात शंकर जगताप यांच्या हस्ते केक कापण्यासठी गेले होते. मात्र, शंकर जगताप यांना कामामुळे केक कापता आला नाही. ते केक न कापताच गाडीत बसून निघून गेले. याचा राग प्रद्युम्न याच्या मनात होता.

 

चिखलीचा फॉर्म्युला सांगवीत

दीड वर्षापूर्वी चिखली येथे नगरसेवक दत्ताकाका साने (Corporator Dattakaka Sane) यांचे ऑफीस काही गुंडांनी फोडून दहशत निर्माण केली होती. या गुन्ह्यात प्रद्युम्नचा वर्गमित्र सॅमसग अ‍ॅमेट (Samsung Amet), देवेंन्द्र बिडलान (Devendra Bidlan) हे सहभागी होते. या गुन्ह्यात दत्ताकाका साने यांच्या राजकीय विरोधक नेत्याचे नाव न घेण्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात देखील जर तन्मय मदने व त्याचे साथीदार पकडले गेल्यास तोच फॉर्म्युला (formula) वापरुन शंकर जगताप यांच्या विरोधकांकडे नाव न घेण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करायची असे नियोजन आरोपी प्रद्युम्न भोसले व तन्मय मदने यांनी केले होते.

 

तन्मयचे वडील डोळ्यांचे डॉक्टर
आरोपी तन्मय मदने हा चांगल्या घरातील मुलगा आहे. त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तन्मय आणि अल्पवयीन मुले, विक्रम जवळकर, प्रद्युम्न भोसले यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सॅमसग अ‍ॅमेट, देवेंन्द्र बिडलान यांच्यावर पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात गुन्हे दाखल आहेत. भोसले हा त्यांचा वर्गमित्र असल्यानेच इझी मनी व शंकर जगताप यांनी त्याच्या वाढदिवसाचा केक न कापल्याचा राग मनात असल्याने त्याने हा गुन्हा केले.

ही कारवाई आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addi CP Dr. Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव (ACP Sridhar Jadhav),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे (Senior Inspector of Police Sunil Tonpe),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे (Inspector of Police Crime Sunil Tambe),
सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे (API Satish Kamble), दिलीप जाधव (API Dilip Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक येडे, गोसावी, वरुडे, गायकवाड, पोलीस हवालदार नितीन काळे, गणेश धामणगावकर,
पोलीस नाईक विजय मोरे, प्रविण पाटील, विवेक गायकवाड, प्रमोद गोडे, सागर सुर्यवंशी, हेमंत हांगे, अनिल देवकर,
विनायक डोळस, विश्वनाथ असवले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Find out the real reason behind the petrol bomb attack on the office of BJP MLA Laxman Jagtap’s brother

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन

Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…

Australian Test Team Captain | 65 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ फास्ट बॉलर बनला टेस्ट टीमचा कॅप्टन !